धाराशिव प्रतिनिधी :- अंगणवाडीच्या मुलांच्या पालकांना सरकारकडून सुकडी दिली जाते. मात्र ही सुकडीची पाकिटं खराब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

धाराशिव प्रतिनिधी :- अंगणवाडीच्या मुलांच्या पालकांना सरकारकडून सुकडी दिली जाते. मात्र ही सुकडीची पाकिटं खराब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडीच्या मुलांना देण्यात आलेल्या सुकडीच्या पाकिटांमध्ये किडे आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जिल्हा परिषद प्रशासनाकडे शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत या अगोदरही तक्रार केली होती. किडे आळ्या बुरशी निघाल्याचे व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात या बाबत विचारणा केली जात आहे. सुकडी पुरवठा करणाऱ्या ससंस्थेवर कारवाईबाबत प्रशासनमात्र डोळे झाक करत असल्याचा आरोप होत आहे. महिला आणि बालविकास विभाग आयुक्तालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना यातून अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांना शासनामार्फत महिला बचत गटाद्वारे विद्यार्थ्यांना सुकडी देण्यात येते. या सुकडीमुळे लहान मुलांच्या जीवनाशी खेळ करतानाचं चित्र सध्या दिसत आहेत. सुकडीची पाकिटं कधी तयार केली याची त्यावर तारीखच नाही, त्यामुळे हा हलगर्जीपणा असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
COMMENTS