Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरिष्ठ सहाय्यक परीक्षेसाठी वेन्यु ऑफिसर यांची कार्यशाळा

सीईओ आशिमा मित्तल यांनी घेतली कार्यशाळा

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने वरिष्ठ सहायक दि.२३ रोजी परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठ

थोरात आणि पटोलेंचे भवितव्य रायपूर अधिवेशनात ठरणार
पायाभूत कामांसाठी हवेत आठ हजार कोटी
किटकनाशकांच्या सुरक्षित वापरासाठी सूचना

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने वरिष्ठ सहायक दि.२३ रोजी परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठी व्हेन्यू ऑफिसर यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी उपस्थित व्हेन्यू ऑफिसर यांना परीक्षा सनियंत्रणा बाबत मार्गदर्शन केले.

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील विविध पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा ही घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने वरिष्ठ सहायक या पदासाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी १८६८ परीक्षार्थींची परीक्षा होणार आहे, परीक्षार्थींनी संख्या जास्त असल्याने १० परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, या परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने व्हेन्यू ऑफिसर यांना परीक्षेसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी हॉल तिकीट बघणे, फ्रिस्कींग, कुठलेही यंत्र कसे तपासावे, त्याचबरोबर अनुचित प्रकार घडल्यास पोलीस यंत्रणा व जिल्हा परिषदेतील परीक्षा नियंत्रण कक्षास (वॉर रूम) तात्काळ माहिती द्यावी अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हे देखील उपस्थित होते.

COMMENTS