Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोगरगाव ग्रामसभेचा ठराव होऊनही कारवाई नाही

ग्रामपंचायतेकडून ग्रामसभेतील ठरावाला केराची टोपली

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून गौरीशंकर महादेव भक्त मंडळ पब्लिक ट्रस्ट प्रशासनाला जाणीवपूर्वक

बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई
रेनबो स्कूलचा सीबीएसईचा 100 टक्के निकाल
जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून गौरीशंकर महादेव भक्त मंडळ पब्लिक ट्रस्ट प्रशासनाला जाणीवपूर्वक त्रास देण्याची बाब समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की घोगरगाव येथे प्राचीन गौरीशंकर महादेव मंदिर अस्तित्वात आहे. या मंदिराचे ठिकाणी मांदळी (ता कर्जत) येथील महान संत आत्माराम गिरी बाबा हे वन तपस्या करत असताना सन 1975 ते 1987 च्या दरम्यान वास्तव्यास होते. आज या ठिकाणी गौरीशंकर महादेव भक्त मंडळ पब्लिक ट्रस्ट मंदिर देखभाल दुरुस्तीचे काम पाहत आहे.

या भक्त मंडळाने सदर मंदिराचे ठिकाणी उपलब्ध असलेल्या शासकिय जमिनीवर वर्षापूर्वी वृक्षारोपण केले आहे.मंदिर प्रशासनाने स्वखर्चाने झाडे जगवण्याचा प्रयत्न केला आहे. आज ट्रस्टच्या या सामाजिक वनीकरण प्रकल्पात चिंचेची शंभर झाडे जगली आहेत. या ठिकाणी आत्माराम बाबांचे तपोवन साकारत आहे. घोगरगाव ग्रामपंचायतीने सदर शासकीय जमिनीतील पाच एकर जमिनीची गावठाण विस्तारासाठी मागणी केलेली आहे. प्रशासकीय कसोटीवर तत्त्वतः ही गावठाण विस्ताराची मागणी मान्य होऊ शकत नाही.असे घोगरगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी मिसाळ भाऊसाहेब यांनी सांगीतले. या शासकीय जमिनीवर चार वर्षापूर्वी तत्कालीन सरपंच बाळासाहेब उगले यांनी आदिवासी समाजातील उपेक्षित लोकांना वास्तव करण्यास सांगीतले, त्याप्रमाणे आदिवासी समाजाने याठिकाणी अधिवास प्रस्थापित केला. आज मंदिर प्रशासनाने मंदिराचा जिर्णोद्धार केला असून सदर परिसर नयनरम्य आहे याठिकाणी अनेक पर्यटक येथे भेट देतात तसेच ही आत्माराम बाबांची तपोभूमी असल्याकारणाने मांदळी येथे येणारे भावीक दर्शनानासाठी तसेच मुक्कामासाठी या ठिकाणी येतात. परंतू ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या अतिक्रमित क्षेत्र मंदिराच्या लगत आहे. येथील लोकांद्वारे भक्तमंडळींना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत. तसा पत्रव्यवहार ग्रामपंचायतीकडे केला असल्याचे ट्रस्टचे सचिव नरेंद्र उगले यांनी सांगीतले. दिनांक 31 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेने सदर अतिक्रमण हटविण्यात यावे असा ठराव संमत केला आहे. ठराव होऊनही घोगरगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. मंदिर विश्‍वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष माऊली बोरुडे यांनी सांगीतले की ही अनेक वर्षांपासूनची समस्या असून या विषयी तहसिलदार श्रीगोंदा,घोगरगाव ग्रामपंचायत, श्रीगोंदा पोलीस स्टेशन तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदने देण्यात आले होते.परंतू तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. आता जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे यामुळे तक्रारीचे निवारण होत नाही. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे असे विश्‍वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.

COMMENTS