Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नैसर्गिक शेतीच्या विस्तार कार्यात बाभळेश्‍वर केंद्राचे कार्य दिशादर्शक

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. योगिता राणा यांचे प्रतिपादन

अहमदनगर ः केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. योगिता राणा यांनी नुकतीच कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वर येथे भेट दिली आणि केंद

स्पर्धा परीक्षेत कणगरचे विद्यार्थी चमकले पाहिजे – सुनील गाढे
वीजबिलांचे दरमहा १० हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊन्स’
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक

अहमदनगर ः केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. योगिता राणा यांनी नुकतीच कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वर येथे भेट दिली आणि केंद्रामार्फत राबविल्या जात असलेल्या नैसर्गिक शेती प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वरचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी दिली.
सदर भेटीच्या वेळी डॉ. योगिता राणा यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेल्या नैसर्गिक आणि सेंद्रिय निविष्ठा उत्पादन प्रकल्पाला भेट दिली आणि नैसर्गिक शेतीच्या प्रात्यक्षिकांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. नैसर्गिक शेती प्रकल्पाचा अवलंब विस्तृत प्रमाणावर वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या स्तरावर कोणकोणत्या उपाययोजना सुरू कराव्या लागतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन डॉ. योगिता राणा यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांशी डॉ. राणा यांनी संवाद साधला आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करताना कोणकोणत्या बाबींचा समावेश त्यांच्या शेतावर करण्यात आलेला आहे हे देखील समजावून घेतले. भविष्यामध्ये जर शेती व्यवसाय शाश्‍वत ठेवायचा असेल आणि उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर नैसर्गिक शेतीकडेच सर्वांना वळावे लागेल असे त्या म्हणाल्या. येणार्‍या दहा वर्षांमध्ये ग्राहक सुद्धा विषमुक्त आहार आणि सुरक्षित अन्न याकडे मोठ्या प्रमाणावर वळणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शेतकर्‍यांनी सुद्धा शेती उत्पादनाला योग्य बाजार भाव मिळावा या दृष्टीने आज पासूनच नैसर्गिक शेतीच्या अवलंबावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राच्या जैविक कीडनाशक प्रयोगशाळा, जिवाणू खत उत्पादन प्रकल्प, माती परीक्षण प्रयोगशाळा आणि कम्युनिटी रेडिओ  स्टेशन या ठिकाणी सुद्धा डॉ. योगिता राणा यांनी भेट दिली आणि सदर सुविधांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात संबंधितांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे  शास्ञज्ञ भरत दवंगे, शांताराम सोनवणे, प्रिया खर्डे, डॉ. विलास घुले, संज्यला लांडगे, कैलास लोंढे, डॉ. विठ्ठल विखे आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करणारे शेतकरी अमोघ गुरावे, आशाताई दंडवते, संजय डांगे आणि मिलिंद गोडगे आदी उपस्थित होते.

COMMENTS