Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत महिला साहित्य संमेलनाचा समारोप 

गोदा कन्यांचा सन्मान आणि नाशिकच्या गोदा कन्या पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक महिला व बालकल्याण विभागातर्फे बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिले महिला साहित्य संमेलन व पुरस्कार वितर

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार
नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारले.
छगन भुजबळ हे नेते नव्हे, तर, ओबीसींच्या शोषकांचे हस्तक ! 

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक महिला व बालकल्याण विभागातर्फे बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिले महिला साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, आयआयटी मुंबई येथील डॉ.श्रेया,ऍड गोदावरी देवकाते,शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड येथे संपन्न झाला. 

महिला म्हणून प्रत्येक महिलेचे योगदान हे सन्मान करण्यासारखे असते त्यामुळे प्रत्येक दिवशी महिला दिन साजरा केला तरी तो कमी आहे नाशिक जिल्हा परिषदेत ५० टक्के कर्मचारी महिला असून काम करतात गाव पातळीवर आशा सेविका या आरोग्याबाबत जागृती करतात तर अंगणवाडी सेविका या बालसंगोपनाचे काम करतात या दोन्ही महिला या खऱ्या अर्थाने प्रशासनाचा पाया आहेत. असे प्रतिपादन करत सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी पुरस्कारार्थी प्रत्येक महिलेची कथा आणि त्यांचे कर्तृत्व हे फोर्ब्स या मासिकात येणाऱ्या महिलांच्या कर्तुत्वासमान आहे, महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगवाडी सेविका या यशोदेच्या भूमिकेतून काम करत असतात, आपल्या पाल्यांच्या सांभाळ करून इतर पाल्यांचे संगोपन करणे हे मोठं काम आहे, अंगणवाडी सेविका हे काम लिलया पार पाडतात असे सांगितले.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान जिल्हाभरात राबवले जाते या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राज्यातील पहिलेच असे महिला साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण हे आयोजित करण्यात आले होते. सकाळी कॉलेजरोड येथे ग्रंथ दिंडी काढण्यात आली या ग्रंथ दिंडीमध्ये महिला टाळ व लेझिम घेऊन सहभागी झाल्या होत्या. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारे नाशिकच्या गोदाकन्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर आयआयटी मुंबई येथील डॉ. श्रेया यांचे महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान पार पडले.

नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये भावना निकम, भीमाबाई जोंधळे, सुनिता खोकले, लता पवार, देवयानी सोनार, विद्या कसबे, कविता भोंडवे, रोहिणी दुगल, रुचिता ठाकूर, मंगला भोये, आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट गार्डाबाल सदन यांचा सन्मान करण्यात आला.

लिंग गुणोत्तर प्रमाण जास्त असलेल्या ग्रामपंचायतींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला यामध्ये विल्होळी, आलियाबाद, रवळगाव, धोंडाळपाडा, देवपाडा, कुंडाणे, देवळीकराड, कुशेगाव, हरणटेकडी, ठाणगाव, सामुंडी, गदडवने, मटाने, सुरगाणे (उ), विंचूरदळवी, भोकणी, अंदरसुल, राजापूर, डोंगरगाव, उंबरखेड, दिक्षी, मूळडोंगरी, निमगाव, रावळगाव, खडकजांब, वडबारे या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला.

द्वितीय सत्रात संमेलनामध्ये कवी संमेलन पार पडले मयुरी धुमाळ, नीता भामरे, बाळासाहेब गिरी, प्रतिमा काळे, रणजीत कुर्हे, सुशीला ढेरंगे, शैला रोकडे, आनंदी गावंडा, मंगला घोंगडे ,सरला दात्रे बापू पवार, शिवाजी खैरे आदी कवींनी दर्जेदार कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. यावेळी सूत्रसंचालन रमेश आराख ,आरती गांगुर्डे,रणजित कुर्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS