Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाच्या हजेरीने पेरणीला आला वेग

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात 5 लाख 32 हजार 287 हेक्टर्स क्षेत्रावर खरीप प

महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप
मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात 5 लाख 32 हजार 287 हेक्टर्स क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सरासरीच्या 105 टक्के, तुरीची 59 टक्के, मूग पिकाची 30 टक्के, उडीद पिकाची 24 टक्के, मका 37 टक्के, बाजरी 61 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
लातूर जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी 5 लाख 99 हजार 455 हेक्टर्स क्षेत्र उपलब्ध आहे. यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 4 लाख 28 हजार 121 हेक्टर्स असून 4 लाख 49 हजार 847 हेक्टर्स क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. मुगाचे सरासरी क्षेत्र 11 हजार 459 हेक्टर असून 3 हजार 514 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 1 हजार 815 हेक्टर्स असून 60 हजार 524 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र 29 हजार 30 हेक्टर असून आतापर्यंत 5 हजार 351 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र 7 हजार 512 हेक्टर असून आतापर्यंत 7 हजार 178 हेक्टरवर लागवड झाली आहे. मका पिकाचे सरासरी क्षेत्र 5 हजार 600 हेक्टर असून 2 हजार 76 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. साळ पिकाचे सरासरी क्षेत्र 1 हजार 272 हेक्टर असून 61 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. बाजरी पिकाचे सरासरी क्षेत्र 837 हेक्टर असून 515 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र 9 हजार 263 हेक्टर असून 2 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. भुईमुगाचे सरासरी क्षेत्र 1 हजार 233 हेक्टर असून आतापर्यंत 166 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीळ पिकाचे सरासरी क्षेत्र 940 हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी 189 हेक्टरवर झाली आहे. कारळ पिकाचे सरासरी क्षेत्र 474 हेक्टर असून 86 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सूर्यफुल पिकाचे सरासरी क्षेत्र 329 हेक्टर असून 5 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

COMMENTS