Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी मणके विकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक : डॉ. विशाल गुंजाळ

नाशिक :  आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मणक्याचे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात.  साठीनंतर मणक्याचे अनेक प्रकारचे आजार होत असले, तरीही 'लंबर कॅनॉल

16 महिन्यांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार| LokNews24
शाहरुख खानचा पठान सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार

नाशिक :  आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मणक्याचे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात.  साठीनंतर मणक्याचे अनेक प्रकारचे आजार होत असले, तरीही ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ हा त्यातील महत्त्वाचा आजार. या आजारामुळे जी लक्षणे दिसतात त्याला ’न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन’ म्हणतात.  साइटिका सारखे लक्षणेदेखील तसेच कंबर दुखणे, चालताना मांड्या, पोटर्‍या भरून येणे, जड पडणे, बधीर होणे, मुंग्या येणे सुरू होते. काही दिवसांनंतर केवळ उभे राहिले तरी मांड्या व पाय भरून येतात. आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास लघवीवरचे नियंत्रण जाणे आणि पायातील स्नायूंची ताकद कमी होणे याची देखील शक्यता असते.त्यासाठी महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक पेन क्लिनिक सेंटरचे मणकेविकार व वेदनातज्ञ डॉ. विशाल गुंजाळ यांनी केले.

लोकज्योती महिला मंडळात  आयोजित व्याख्यानात डॉ. गुंजाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा कुमुदिनी कुलकर्णी, उल्का कुरणे, वैशाली पिंगळे, सविता चतुर, कमला पणेर, शिला राजपूत उपस्थित होत्या.

डॉ. गुंजाळ म्हणाले की, मणकेविकार टाळायचे असल्यास विविध व्यायाम,  जीवन शैली बदलने, आहारावर नियंत्रण,  वजन कमी करणे,  योग्य निदान व वेळेवर योग्य उपचार केल्यास  बहुसंख्य रूग्णांना ऑपरेशनची गरज लागत नाही. अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान व संशोधनामुळे इंजक्ेशन व औषधोपचारामुळेही मणकेविकाराचा त्रास टाळता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे कुठलेही दुखणे अंगावर काढण्याऐवजी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महीला मंडळातर्फे सभासंदासाठी हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्का कुरणे यांनी केले तर सूत्रसंचालन मंजुषा पहाडे, आभार सविता चतुर यांनी केले. यासाठी जया खोडे, अनिता जस्ते, जयश्री राणे, कुमुदिनी पाटिल तसेच संचालक व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मोठ्या संख्येने महिला  उपस्थित होते.

COMMENTS