Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीराकडून महिलेचा गळा दाबून खून

पुण्याच्या मुंढवा भागातील केशवनगरातील घटना

पुणे : जुन्या घरगुती वादातून तसेच दारु पिण्यासाठी पैसे मागून देखील ते न दिल्याचा राग आल्याने एका दीराने भावाच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा ध

आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न
नगरमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीने चर्चेला उधाण
नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी

पुणे : जुन्या घरगुती वादातून तसेच दारु पिण्यासाठी पैसे मागून देखील ते न दिल्याचा राग आल्याने एका दीराने भावाच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा भागात केशवनगर याठिकाणी घडला आहे. कविता नागराज गडदर (वय-24) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा दीर मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय-23, रा.केशवनगर, मुंढवा,पुणे) या आरोपीस पोलिसांनी अटक केले आहे.
याबाबत आरोपी विरोधात सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सिध्देश्‍वर माळी (वय-48) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कुटुंब हे मुंढवा परिसरातील साईबाबा कॉलनी येथे रहाण्यास आहे. महिलेचा पती हा गावी नातेवाईक आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी सेटिंगचे काम करणारा आरोपी मल्लिकार्जुन गडदर हा घरी होता. कविता गडदर या त्यांचे राहते घरात असताना, त्यांचा लहान मुलगा हा हॉलमध्ये झोपी गेला होता. त्यावेळी आरोपी याने मयताची मुलगी हिला खेळण्यासाठी घराचे बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने जुन्या घरगुती भांडणाचे कारणावरुन तसेच दारु पिण्यासाठी पैसे मागण्याचे वादाचे कारणावरुन कविता गडदर हिचा गळा हाताने कशाचे तरी सहाय्याने दाबून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी हा पसार झाला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, मुंढवा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर, आरोपीचा शोध घेऊन त्यास देखील अटक केली. आरोपी व मयत महिला यांच्यात किरकोळ कारणावरुन घरात सतत वाद सुरु होते तसेच दारु पिण्यासाठी मयत पैसे देत नसल्याचा राग आरोपीला होता त्यामुळे त्याने खून केल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक एस निकम यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.

COMMENTS