Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग

पुणे/प्रतिनिधी ः कार पार्किंगच्या वादातून महिलेच्या कानशिलात लगावत विनयभंग केल्याची घटना पुण्यातील साळुंके विहार येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी

अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते
मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः कार पार्किंगच्या वादातून महिलेच्या कानशिलात लगावत विनयभंग केल्याची घटना पुण्यातील साळुंके विहार येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिकव्हरी एजंटला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुरुवारी दिली. विश्‍वास भापकर असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पिडीत 38 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील साळुंके विहारमधील एका सोसायटीत राहणार्‍या 38 वर्षीय महिलेची कार पार्क करत असताना, कारचा धक्का शेजारील घराच्या गेटला लागला. त्यावरून या घरात राहत असलेल्या रिकव्हरी एजंटने महिलेच्या कानशिलात लगावली व तिची गचंडी पकडून झटापट करत तिचा विनयभंग केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी विश्‍वास भापकर हे साळुंके विहार मधील सुप्रिम हाईट्स या एकाच सोसायटीत राहण्यासाठी आहे. भापकर येथे घर सोसायटीच्या पार्किंग मध्ये असून कार पार्किंग वरून सोसायटीतील व्यक्ती आणि त्याचे वारंवार वाद होत असतात. तक्रारदार महिला बुधवारी रात्री तिची कार सोसायटीच्या आवारात पार्क करत असताना तिच्या कारचा धक्का आरोपीच्या घराच्या गेटला लागला होता. या कारणावरून विश्‍वास भापकर याने घराबाहेर येत महिलेशी असभ्य वर्तन केला. याप्रकरणी आरोपीवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महिलेस डाव्या कानास ऐकू येत नसल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक एम सुरवसे पुढील तपास करत आहेत.

COMMENTS