Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनगरवाडीत महिलेचा बुडून मृत्यू

गोंदवले / वार्ताहर : मौजे बनगरवाडी, ता. माण, जि. सातारा गावचे हद्दीत औढा नावचे शिवारात सौ. आहिल्या सुनिल बनगर (वय 20) वर्षे ही महिला पाण्यात पड

भाजपचा कार्यकर्ता मेळावा इंदिरा पॅलेस हॉलमध्ये शनिवारी होणार
कुडाळ ग्रामपंचायतींचा निधी जिल्हा परिषद दिव्यांग निधीमध्ये घेऊ नये : विरेंद्र शिंदे
कोयनेत गढूळ पाणी पुरवठा; प्रकल्पावर महिलांचा हंडा मोर्चा

गोंदवले / वार्ताहर : मौजे बनगरवाडी, ता. माण, जि. सातारा गावचे हद्दीत औढा नावचे शिवारात सौ. आहिल्या सुनिल बनगर (वय 20) वर्षे ही महिला पाण्यात पडून बुडून मयत झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 21 रोजी पहाटे 5.00 वा. ते दि. 22 रोजी सकाळी 6:30 च्या दरम्यान मौजे बनगरवाडी, ता. माण, जि.सातारा गावच्या हद्दीत औढा नावाच्या शिवारात स्मशानभुमी जवळील सातकी जाणारे कच्च्या रस्त्या जवळील श्रीमंत रंगनाथ बनगर (रा. बनरगरवाडी) यांच्या शेतातील विहरीत सौ.आहिल्या सुनिल बनगर ही पाण्यात बुडुन मयत झाली आहे. अशी फिर्याद मयताचे चुलते नवनाथ बाबा ढेरे (वय 35, रा. बनगरवाडी, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलिसांना दिली. अधिक तपास पोलीस हवालदार आर. के. फडतरे करत आहेत.

COMMENTS