मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली आहे. तिकीट तपासणी कर्मचार्यांनी सहप्रवाशाच्या मदतीने महि

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली आहे. तिकीट तपासणी कर्मचार्यांनी सहप्रवाशाच्या मदतीने महिला प्रवाशाला प्रसुतीस मदत केली. टीसी आणि ट्रेन मधील सहप्रवासी मदतीला धावून आल्याने महिलेची सुखरुप प्रसूती झाली. मध्य रेल्वेने ट्वीट करत या प्रसंगामध्ये मदतीला आलेल्या प्रवासी व रेल्वे कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान नवजात बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
COMMENTS