Homeताज्या बातम्यादेश

धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार

उत्तरप्रदेश प्रतिनिधी - धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उत्त

महिला आयोगाच्या अध्यक्ष एका पोलीस अधिकारी महिलेवर संतापल्या
जिल्ह्यातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
शेपवाडी गावातून कुंभार समाजातील पहिली महिला पोलीस

उत्तरप्रदेश प्रतिनिधी – धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं. त्यानंतर स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कमलेश कुशवाह (वय २२ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तैनात पोलीस दलासाठी स्पेशल ट्रेन चालवण्यात आली होती.

पोलिसांना  सोडून रविवारी रात्री ही ट्रेन रिकामी परतत होती. यावेळी ट्रेनमध्ये कुणीच नव्हतं. पीडित महिलेला उचाहर येथे जायचं असल्याने ती या ट्रेनमध्ये चढली. दरम्यान, आरोपी कमलेश हा ट्रेनमध्ये आधीपासूनच हजर होता. त्याने महिलेला टॉयलेटमध्ये जाताना बघितलं .

टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आरोपीने कमलेशने पीडितेला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्याने पीडितेवर तीन वेळा बलात्कार देखील केला. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला ट्रेनमधून ढकलून दिलं. अंगावर अर्धवट कपडे असतानाही पीडिता जखमी अवस्थेत जवळच्या पोलीस स्थानकात पोहचली. महिलेवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच सतना पोलिसांनी तातडीने रेल्वे पोलिसांसोबत संपर्क साधत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या

COMMENTS