Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजा विक्री प्रकरणातील अटक केलेली महिला फरार

पुणे ः पुणे शहरातील वाघोली परिसरात गांजा विक्री प्रकरणात अटकेत असलेली  महिला आरोपी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यातून पोलिस कामात व्यस्त असताना नजर चु

पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही
देशाचा विकासदर राहणार 9.1 टक्के ; ‘मुडीज’चा अंदाज
बोगस क्रीडा प्रमाणपत्राआधारे 109 जणांनी लाटली सरकारी नोकरी

पुणे ः पुणे शहरातील वाघोली परिसरात गांजा विक्री प्रकरणात अटकेत असलेली  महिला आरोपी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यातून पोलिस कामात व्यस्त असताना नजर चुकवून पसार झाल्याची घटना घडली आहे. छकुली राहुल सुकळे (वय-24,रा.वाघोली,पुणे) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव असून तिचा शोध पोलिसांची पथके घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातील गायरान वस्ती याठिकाणी एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 25 एप्रिल रोजी रात्री लोणीकंद पोलिसांनी छापा मारुन छकुली सुकळे या आरोपी महिलेस पकडले. तिच्या ताब्यातून एक किलो 329 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. परंतु रात्रीची वेळ असल्याने तिला अटक न करता, तिला नोटीस देऊन 26 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता अटक कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलिस ठाण्यात तिला घेऊन आल्यानंतर महिला पोलिस शिपाई एस तळेकर तिच्यावर लक्ष्य ठेवत होत्या. तिचे हाताचे ठसे घेऊन झाले होते. परंतु सीसीटीएनएस कक्षात काम करत असताना, आरोपी छकुली सुकळे ही पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातून पसार झाली. पोलिसांना सदर बाब लक्षात आल्यानंतर, धावपळ उडाली व तिचा सर्वत्र शोधाशोध सुरु करण्यात आला. परंतु ती मिळून न आल्याने याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे यांनी आरोपी विरोधात भादवि कलम 224 नुसार तक्रार दाखल केली आहे. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास करे यांचे पथक पुढील तपास करत आहे.

COMMENTS