बुलडाणा - बुलडाणा शहरात अवैध धंदे हे भर रस्त्यांवर चालू आहेत हे सर्व उघड्या डोळ्यांनी पोलीस अधिकारी पाहत आहेत, कारवाई होत नसल्याने आता त्याच
बुलडाणा – बुलडाणा शहरात अवैध धंदे हे भर रस्त्यांवर चालू आहेत हे सर्व उघड्या डोळ्यांनी पोलीस अधिकारी पाहत आहेत, कारवाई होत नसल्याने आता त्याचे लोन ग्रामीण भागात जाऊन पोहचले असून,पूर्वी छुप्या पद्धतीने रात्री बे रात्री गावठी दारू तयार होत असे मात्र दारू अड्डे वाल्यांना एकदा का पोलीस प्रशासनाचे व राज्य उत्पादन शुल्क विभागा सोबत हात मिळवणी केली की आवैध दारु विक्री खुलेआम सुरू होते, ज्यांनी हफ्ता दिला नाही त्यांच्यावर कार्यवाही होते हमखास होते अशी चर्चा आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग नियमित कार्यवाही करण्याचा कीतीही दावा करत असेल तरी मात्र जे मोठे अड्डे आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्या मुळे
गावठी दारूच्या अड्ड्यांवर सैलानी परिसर व घाटनांद्रा,येथे कारवाई झाली नाही. आणि रायपूर पोलिसांकडे सजग नागरिकांनी तक्रार केल्यास, उलट ‘कोठे आहे अड्डा, ठिकाणाचे नाव सांगा, जास्त समाजसेवक बनू नका, बघू कारवाई करू,’ असा सल्ला पोलिस प्रशासन देत आहे. अर्थात त्यांची मिलीभगत असल्याशिवाय हे धंदे चालू शकत नाही हे नागरिकांना सांगण्याचीगरजनाही.त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. घाटनांद्रा येथे सर्रास खुलेआम हातभट्टीच्या दारूची निर्मिती सुरू असून येथून तालुक्यात इतर भागांत विक्री होत आहे. त्यावर अंकुश राहावा यासाठी स्थानिक पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा असे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे, तसेच बनावट दारूचा साठा जप्त करण्याचे काम करत नाही. हे काम आमचे नाही, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असल्याने त्यांनी कारवाई करावी, असेही पोलिसांकडून सांगितले जाते. दोन्ही विभागांत समन्वयाचा अभाव असल्यामुळे संयुक्त कारवाई होत नाही. त्यामुळे गावठी दारू विकणाऱ्यांचे बस्तान बसले आहे.
तर ग्रामीण भागात देशी दारु चढ्या दराने विक्री केली जाते त्या मुळे गावठी दारूला जास्त मागणी आहे.तर पोलिस ठाण्यांमध्ये या गावठी दारू माफियांची ये-जा असल्याने व राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्या पर्यंत पोहचत नसल्याने कारवाई होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकही तक्रार करण्यास पुढेत येत नाहीत, येवढे मात्र नक्की
ग्रामीण भागात कुठेही सर्रास गावठी दारू सहज स्वस्तात उपलब्ध होत असल्याने दारू बंदी साठी लढणाऱ्या महिलांचे हनन होत आहे, पोलीसांनी गावातील स्थानिक ठिकाणची दारू बंद करावी. व त्यांच्याकडून होत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. एक नागरिक, घाटनांद्रा ता. चिखली जिल्हा बुलडाणा
COMMENTS