Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयभवानी यंदा सात लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करणार-अमरसिंह पंडित

गेवराई प्रतिनिधी - जयभवानीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीत बदल केल्यामुळे आता जयभवानीने कात टाकली आहे. मागच

धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्री पदाचा लाभ सामान्य शेतकर्‍यांना मिळेल-अमरसिंह पंडित
शारदा प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी गरजुंनी नोंदणी करावी-अमरसिंह पंडित
ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार करू-अमरसिंह पंडित

गेवराई प्रतिनिधी – जयभवानीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीत बदल केल्यामुळे आता जयभवानीने कात टाकली आहे. मागच्या वर्षी विक्रमी गाळपानंतर या हंगामात 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या गळीत हंगामासाठी रोलर पुजन करत असताना ते बोलत होते.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या गळीत हंगामाचा रोलर पुजन समारंभ मच्छिंद्रनाथ गडाचे महंत मठाधिपती ह.भ.प.जनार्धन महाराज शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवार, दि. 24 जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव(दादा) पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, माजी उपसभापती  शाम मुळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. जनार्दन महाराज आणि संचालक शरद चव्हाण यांच्या हस्ते रोलर पुजा करण्यात आली. चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या हस्ते यांनी रोलर कार्यान्वित करण्यात आले.  पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्जहणाले की, जयभवानी सहकारी साखर कारखाना 2023-2024 च्या 41 व्या गळीत हंगामासाठी सज्ज असून गळीत हंगाम 2022-23 मध्ये कारखान्याची गाळप क्षमता 2500 मे. टनावरून 5000 मे. टना पर्यन्त वाढविलेली आहे व या हंगामातील 134 दिवसात 6 लाख 19 हजार 878 मे.टन ऊस गाळप करून 5 लाख 27 हजार 395 पोते साखर उत्पादन झालेलेआहे, तसेच 10.15 % सरासरी साखर उतारा आलेला आहे. आसवणी प्रकल्पामधून 8 लाख 20 हजार 82 बल्क लिटर बी-हेवी स्पिरीट उत्पादित झालेले आहे. गळीत हंगाम 2023-24 साठी कार्यक्षेत्रात 12 हजार 427 हेक्टर ऊसाची नोंद झाली असून त्यापासून अंदाजे 8 ते 9 लाख मे.टन ऊस गाळपास उपलब्ध होईल तसेच बिगर नोंदीचा 5हजार 500 हेक्टर ऊस असून त्यापासून 4 लाख मे.टन ऊस उपलब्ध होणार आहे. असा एकूण 12 ते 13 लाख मे. टन ऊस कारखाना कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. या हंगामात कारखान्याने 7 लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठरविलेले आहे त्याकरिता कारखान्याने ऊस तोड वाहतूक यंत्रणेची उभारणी केलेली आहे असेही ते म्हणाले. यावेळी ह.भ.प. महंत जनार्धन महाराज यांनीही शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाला संचालक सर्वश्री नारायणराव नवले, गणपतराव नाटकर, साहेबराव चव्हाण,शंकरराव तौर, आप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे, संभाजी पवळ,विजयकुमार घाडगे, रावसाहेब देशमुख, भिमराव मोरे यांच्यासह हनुमान कोकणे, चंद्रकांत पंडित, भारतराव पंडित, विश्वांभर काकडे, शेख मिनहाज, रवि शिर्के, कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, जगन्नाथ दिवान, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, चिफ इंजिनिअर अशोक होके, शेतकरी अधिकारी जगन्नाथ शिंदे, चिफ अकाऊंटंट सौरभ कुलकर्णी, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, डिस्टलरी इनचार्ज राजेंद्र बडे, सिव्हील इंजिनिअर भालचंद्र कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी एस.एन.औटे, संगणक विभागाचे धनाजी भोसले, खरेदी विभागाचे सुशांत सोळंके यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुक ठेकेदार, कामगार, कर्मचारी, अधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.

COMMENTS