अकोले/प्रतिनिधी ः अकोलेच्या मातीने आपल्यास घडविले, या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हढे करता येईल तेव्हढे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग
अकोले/प्रतिनिधी ः अकोलेच्या मातीने आपल्यास घडविले, या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हढे करता येईल तेव्हढे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. हिंद सेवा मंडळ संचलित ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व बालक मंदिर च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानाहून माजी खासदार वाकचौरे बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक रोशन पिंगळे, हिंद सेवा मंडळाचे सह सचिव रणजित श्रीगोड, भास्करराव कदम, हिंद सेवा मंडळाचे सहसचिव दिलीप शहा, मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन सतीश बुब, बालक मंदिराच्या चेअरमन स्मिता मुंदडा, सहा. सचिव योगेश देशमुख, प्रा आदिनाथ जोशी, कल्याण लकडे, दत्तात्रय काशीद, मॉडर्नचे प्राचार्य संतोष कचरे, उपप्राचार्य प्रा.दीपक जोंधळे, पर्यवेक्षक सुधीर जोशी, माजी प्राचार्य अयाज शेख, मोरेश्वर धर्माधिकारी, रामनिवास राठी, पत्रकार अमोल वैद्य, संजय गोपाळे,अनिल जोशी, माधवराव तिटमे, ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी, भागवत त्रिभुवन,प्रभावती महाले, पुष्पाताई वाणी, आशा बापट, दीपाली मुंदडा,स्वाती सारडा, पुष्पा बहिरट, नगरसेविका श्वेताली रुपवते, अनिल भळगट,विलास वाकचौरे, रामेश्वर रासने,धनंजय जाजू, कार्तिक धामणे, संदीप जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. माजी खासदार वाकचौरे यांनी ज्ञानवर्धिनी बालक मंदिरच्या बैठकीसाठी मुनटेबल व चेअर्स साठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अहवाल वाचन मुख्याध्यापक रावसाहेब नवले यांनी केले.सूत्रसंचालन दिलशाद सय्यद यांनी केले तर आभार योगेश नवले यांनी मानले.
COMMENTS