डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे व्हेरियंट आढळले ; महाराष्ट्राची चिंता वाढली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे व्हेरियंट आढळले ; महाराष्ट्राची चिंता वाढली

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण असले तरी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. डेल्टा प्लसमुळे 5 रुग्

Sangamner : संगमनेर शहरातील डोंबिवली बँकेला लागली आग (Video)
पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड अटकेत
ताई आणि भाऊंचे प्रमोशन की डिमोशन ?

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण असले तरी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. डेल्टा प्लसमुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून ही रुग्णसंख्या 66 वरून 76 वर पोहचल्यामुळे खळबळ उडाली असतानांच राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे तीन वेगवेगळे व्हेरियंट समोर आले आहेत.
राज्यात काल दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या 76 झाली आहे. राज्यात आज आढळळेल्या डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये कोल्हापूर 6, रत्नागिरी 3, सिंधुदुर्ग 1 या रूग्णांचा समावेश आहे. तज्ज्ञाच्या मते डेल्टा प्लस विषाणूच्या नव्या रुपाची माहिती जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळे ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत असल्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात जिनॉम सिक्वन्सिंगद्वारे डेल्टाचे 66 रुग्ण असल्याची माहिती समोर आली होती. त्यात डेल्टा प्लसचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना एवाय 1, एवाय 2 आणि एवाय 3 अशी नावे देण्यात आली आहे. तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी 13 उपवंशांचा शोध लावला आहे. एवाय 1, एवाय 2 आणि एवाय 3 पासून त्यांची सुरुवात होते. डेल्टा विषाणूचे म्युटेशन झाल्यानं डेल्टा प्लसची निर्मिती झाली आहे. डेल्टाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये घ417छ नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळं डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे. डेल्टा प्लसच्या 13 प्रकारांमधील 3 प्रकार महाराष्ट्रात सापडले आहेत. सुरुवातीला डेल्डा प्लसवर मोनोक्लोमल अँटीबॉडी कॉकटेल ट्रीटमेंटचा प्रभाव फारसा उपयोग होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं डेल्टा प्लसचा संक्रमणाचा दर अधिक असल्याचं लक्षात येते. मुंबईत डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तसंच, या महिलेच्या कुटुंबातील 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील दोन जणांमध्ये डेल्टा विषाणू आढळला आहे.

COMMENTS