Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी भिडे यांच्या राष्ट्रद्रोही वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री व राज्य गृहमंत्री राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का ?- शामसुंदर जाधव

बीड प्रतिनिधी - देशासह राज्यांमध्ये अनेक विद्रोही वक्तव्य आज राजकीय मंडळी करीत असल्याने देशासह राज्यातील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप जिल्हा

कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
कार आणि बाईकचा भीषण अपघात.
मोठी घडामोड… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री थोरात गेले फडणवीसांच्या भेटीला

बीड प्रतिनिधी – देशासह राज्यांमध्ये अनेक विद्रोही वक्तव्य आज राजकीय मंडळी करीत असल्याने देशासह राज्यातील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस बीडचे शामसुंदर जाधव यांनी केला आहे. काही कार्यकर्ते आपल्या विद्रोही वक्तव्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये दंगली घडवण्याचे काम करत असून त्यांच्यावर राज्य व केंद्र सरकारचा अंकुश राहिलेला नाही. संभाजी भिडे या वयोवृद्ध व अल्प बुद्धी असलेल्या व्यक्तीने राष्ट्राबद्दल अपमान जनक वक्तव्य करून राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाबद्दल आपली उदासीन भूमिका मांडण्याचे काम केले आहे. संभाजी भिडे यांच्या राष्ट्र विद्रोही वक्तव्यावर केंद्रीय गृह खाते व राज्य गृह खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने अशा नतदृष्ट लोकांची हिम्मत वाढत आहे यांना पाठीशी घालणार्‍या केंद्रीय व गृह राज्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये शांतता व संयम ठेवणे ही काळाची गरज असताना समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम काही समाज कंटक करत असल्याचा आरोप ही यावेळी त्यांनी केला. राज्य व केंद्र सरकारने फिर्यादी होऊन संभाजी भिडे यांच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेणार का असे ही यावेळी शामसुंदर जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राज्य व केंद्रीय गृह खात्याला प्रश्न उपस्थित केला.

COMMENTS