Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंडाळीचे राजकीय बॉम्ब फुटणार का ? ; बंडखोरांच्या समजुतीसाठी नेत्यांच्या जोरबैठका सुरू

मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अनेक बंडखोरांनी अर्ज दाखल केले तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याच

शहर व परिसरावर पसरली धुक्याची चादर 
मविआत कसलेही मतभेद नाहीत : नाना पटोले
संगमनेरमध्ये काँगे्रसच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अनेक बंडखोरांनी अर्ज दाखल केले तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याच सहकारी पक्षांच्या विरोधात उमेदवारी देत उमेदवारांना एबी फॉर्म देखील दिले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना आपल्या राजकीय कसब लावत या इच्छुकांची मनधरणी करून त्यांचे अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ऐन दिवाळीत या बंडखोरांच्या बंडाळीचे राजकीय बॉम्ब फुटू नयेत यासाठी त्यांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. या बैठकीत बंडखोरांचे मन वळवण्याच्या व्युहरचनेवर काम केले जाणार आहे. सत्ताधारी शिवसेनेतील बंड रोखण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत. ते सर्व बंडखोरांशी संवाद साधून या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, माहीम विधानसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे स्वतः विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. या ठिकाणी मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिलेत. पण विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी येथून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यामुळे अमित ठाकरे यांचा विधानसभेवर जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे.

भाजपलाही बंडखोरीचा मोठा फटका
शिस्तप्रिय पक्ष मानल्या जाणार्‍या भाजपलाही या निवडणुकीत बंडखोरीचा जोरदार फटका बसला आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाळ शेट्टी यांनीही पक्षाविरोधात बंडाचा झेंडा रोवला आहे. भाजपच्या माजी खासदार हिना गावीत यांनीही अक्कलकुवा मतदारसंघात केली बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरांना 5 दिवसांत शांत करण्याचे मोठे आव्हान पक्षातील नेत्यांपुढे उभे टाकले आहे. मुंबई पट्ट्यातून शिवसेनेच्या कुणाल सरमळकर व भाजपच्या अतुल शाह यांनीही बंडखोरी केली आहे.

COMMENTS