Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूमिपुत्रांच्या घरादारावर वरवंटा फिरवणार का ?

बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई/प्रतिनिधी ः पोलिसांच्या दमनाशाहीचा वापर करून, भूमिपुत्रांच्या डोक्याला बंदुका लावून जर हा प्रकल्प करणार असाल तर, या प्रकल्पाला आम्ही प्रखर

उद्धव-राज येणार एकत्र ?
आमचे वैचारिक व्यासपीठ एकच – उद्धव ठाकरे
राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको

मुंबई/प्रतिनिधी ः पोलिसांच्या दमनाशाहीचा वापर करून, भूमिपुत्रांच्या डोक्याला बंदुका लावून जर हा प्रकल्प करणार असाल तर, या प्रकल्पाला आम्ही प्रखर विरोध करू, बारसूतल्या जमिनी उपर्‍यांनी घेतल्या आहेत. माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावर उपर्‍यांचा वरवंटा फिरवणार का? लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढले जाते. ही कुठली लोकशाही आहे? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.
बिहारचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी गुरूवारी ’मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कपिल पाटील उपस्थित होते. ठाकरे आणि ठाकूर यांच्यात बराच वेळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर आहे. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतो, असे म्हणत ठाकरे यांनी शरद पवारांना उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बजरंगबली की जय, असे बोलून मतदान करा, असे सांगतात. मला वाटते आता निवडणूक कायद्यात बदल झाला असेल. बाळासाहेब ठाकरे असे पूर्वी म्हणाले, तर त्यांच्या मतदानाचा हक्क काढल्याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आता मी मराठी भाषकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून मराठी अस्मिता जपणार्‍या उमेदवाराला कर्नाटकात मतदान करा, असे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय होऊ द्या. त्यावर मग बोलेन. मात्र, शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याते ते म्हणाले. तसेच आपल्याकडूनही महाविकास आघाडीला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. मोदींचा नाही, तर प्रवृत्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना मी काय सल्ला देणार? मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला, तर काय करू? त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे त्यांनी सांगित

महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी- उद्धव ठाकरे म्हणाले की, बारसूत मी भाजप, शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही. नाणार प्रकल्प रद्द केला. ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री झालो. दिल्लीतून सूचना आल्या. चांगला प्रकल्प आहे, जाऊ देऊ नका, असे सांगितले. मात्र, आता महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. केवळ माझे पत्र घेऊन नाचू नका. माझ्यात काळात येणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी का? त्यासाठी डोक्यावर बंदूक टेकून परवानग्या घेता आणि प्रकल्प चांगले सांगता. याला काही अर्थ आहे का, असा सवाल त्यांनी केला.

COMMENTS