Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडसह मराठवाड्यातील हज यात्रेकरूंच्या प्रवासभाडे संदर्भात पीएमओ कार्यालय आणि स्मृती इराणी यांच्याशी बोलणार – पंकजाताई

सलीम जहाँगीर यांच्यामुळे या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे भाग्य मिळाले - पंकजाताई

बीड प्रतिनिधी - हज यात्रेसाठी विमान प्रवासाच्या तिकिटातील तफावत दुरु करण्यासंदर्भात बीड शहरातील हज यात्रेकरूंचे शिष्टमंडळ भाजपच्या राष्ट्रीय सचि

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आजपासून गोदा महोत्सव
हॉटेल संचालकावर गुन्हा, बायकोकडे 25 लाखांचा तगादा? | LOKNews24
उल्हासनगरात पैशाच्या वादातून भररस्त्यात हाणामारी

बीड प्रतिनिधी – हज यात्रेसाठी विमान प्रवासाच्या तिकिटातील तफावत दुरु करण्यासंदर्भात बीड शहरातील हज यात्रेकरूंचे शिष्टमंडळ भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना भेटले. यावेळी भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यासह हज कमिटी पदाधिकारी , सदस्य यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. माझ्या जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील मुस्लिम नागरिक हज यात्रेसाठी जात आहेत. त्यांच्या अडचणी सोडविणे हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. विमान प्रवासातील तिकीट दराची तफावत दुरु करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री कार्यालय आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांच्याशी बोलणार असून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवेन असा शब्द भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी हज यात्रेकरूंच्या शिष्टमंडळाला दिला.
बीड येथील शासकीय विश्राम गृहात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची सलीम जहाँगीर यांच्यासह हज यात्रेकरूंच्या शिष्टमंडळाने रविवार रात्री भेट घेतली. प्रवासभाडे संदर्भात नियोजन करण्यात भारतीय  कमिटी कडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. मुंबईहून विमानाने जाण्यासाठी 3 लाख 4 हजार 843 रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. तर त्याच प्रवासासाठी औरंगाबाद येथून 3 लाख 92 हजार 738 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातुन हजला जाणार्‍या मुस्लिम भाविकांना प्रति व्यक्ती 88 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत,  हा फरक दूर करावा अशी करावा अशी मागणी यावेळी सलीम जहाँगीर यांच्यासह शिष्टमंडळाने भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली. यावेळी पंकजाताईंनी सदरील प्रकार हा तांत्रिक बाबींमुळे झाला असावा एका कुटुंबातील दोन व्यक्तींना हज यात्रेसाठी जाण्याकरिता विमान प्रवास भाड्यातील तफावत आर्थिक झळ देणारी आहे. या संदर्भात मी स्वतः प्रधानमंत्री कार्यालय आणि स्मृती इराणी यांच्याशी बोलणार आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आवश्यकता भासल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलेन मात्र विमान प्रवासातील तिकीट दराची तफावत दूर करणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

COMMENTS