Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?

खासदार संजय काका पाटील यांचा दावा

सांगली/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत दाखल झाला आहे. त्याचबरोबर गेल्या का

राज्यभरात चोरी करणाऱ्या इंदोर येथील टोळीसह एका स्थानिक टोळीला अटक  
रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड
नाथषष्ठी सोहळ्यात लाखो भाविकांची मांदियाळी

सांगली/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत दाखल झाला आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असतांनाच जयंत पाटलांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल असा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे.
  जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात येतील, असे संकेत सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहेत. मिरजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपच्या होकायंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया… असे सूचक वक्तव्य खासदार संजयकाका पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. संजय काका पाटील यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंती पाटील कुठे जाणार ? अशा चर्चा सुरू आहेत. यावरून संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार ? असा प्रश्‍न उपस्थित करत जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश होईल, असे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार तसेच पदाधिकार्‍यांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे. तर काही एकनिष्ठ नेते अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. जयंत पाटील सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. ते आता भाजपसोबत जातील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

जयंत पाटील राष्ट्रवादीतच राहतील ः रोहित पवार – सांगलीचे लोकल नेत्याच्या वक्तव्यावर लक्ष देऊ नका, जयंत पाटील हे शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबत असतील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. कोण काय उल्लेख करतील याकडे आपण दुर्लक्ष करायचे. ज्यांनी (भाजपने) शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी फोडली, त्यांचा स्वत:च्या कार्यकारणीवर विश्‍वास राहिला नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. भाजपची नेहमी पक्ष फोडाफोडीची प्रवृत्ती राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून त्यांना किती यश आले हे माहित नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांचे फोटो लावून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. ती त्यांची (अजित पवार गट) रणनीती असू शकते, लोकांचा प्रतिसाद काय आहे हे महत्वाचे आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

COMMENTS