Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरी प्रश्‍न सोडविण्यात महापालिकेला अपयश का ?

अहमदनगर/प्रतिनिधी ः कोणत्याही शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी जनता देखील आपल्या हक्काप्रती सजग असायला हवी. अन्यथा यथा प्रजा तथा राजा या म्हणीप्

अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्याप्रश्‍नी प्रशासनाकडून महापालिकेला पाठिशी घालण्याचा प्रकार
संकलित कर थकबाकीचे पैसे आणा, नाहीतर दंडाला सामोरे जा…
नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज

अहमदनगर/प्रतिनिधी ः कोणत्याही शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी जनता देखील आपल्या हक्काप्रती सजग असायला हवी. अन्यथा यथा प्रजा तथा राजा या म्हणीप्रमाणे जनता जशी असेल, तसेच लोकप्रतिनिधी आपल्याला भेटत असतात. अहमदनगर महापालिकेची स्थापना होवून दोन दशकांचा कालावधी उलटला असला, तरी शहरात नागरी सुविधा देण्यास महापालिका अपयशी ठरतांना दिसून येत आहे. 1972 मध्ये जेव्हा महापालिका अस्तित्वात नव्हती, तेव्हा नवनीतभाई बार्शीकर यांच्या कार्यकाळात अहमदनगर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा व्हायचा. मात्र त्यानंतर शहरातील पाणीप्रश्‍न बिकट बनत चालला आहे. अनेक भागात तर आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होता. यातून नगर शहरातील पाणीपुरवठ्याचे अपयश दिसून येते.

कोणतेही आदर्श शहराचा विकास करतांना त्या शहरामध्ये मुबलक प्रमाणात, पाणी, आरोग्याच्या दर्जेदार सुविधा, शिक्षण, वीज, पायाभूत सोयी-सुविधांची व्यवस्था करून देण्याची गरज आहे. मात्र महापालिकेने आणि शहरातील स्थानिक आमदारांनी देखील एमआयडी अजून जास्तीत जास्त प्रमाणात विकसित होण्यासाठी लक्ष देण्याची गरज होती. मात्र विकासाचा कोणताही दृष्टीकोन नसल्यामुळे नगर शहरात उद्योगधंदे विकसित होवू शकलेले नाही. शहरातील लाखो विद्यार्थी आजमितीस शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी पुणे-मुंबईला स्थलांतर करतांना दिसून येत आहे. परिणामी शहरातील पैसा इतर शहरात जातांना दिसून येत आहे. आज जर शहरात चांगल्या दर्जेदार शिक्षणव्यवस्था आणि रोजगार उपलब्ध झाले तर, हजारो विद्यार्थी पुणे-मुंबईला प्राधान्य देईल. मात्र विकासाची कोणतीही दृष्टी नसल्यामुळे अहमदनगर शहराचा विकास रखडतांना दिसून येत आहे. एकीकडे संगमनेर, शिर्डी-राहाता सारखे तालुके विकसित होत असतांना त्या तुलनेने नगर शहर अद्यापही विकसित होतांना दिसून येत नाही. शहराचा विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज असून, त्यादृष्टीने नगर शहर विकसित करण्याची गरज आहे. मात्र नगर शहराची खेडेगाव ही ओळख पुसण्यात येथील लोकप्रतिनिधी जसे अपयशी ठरले त्याचप्रमाणे प्रशासन देखील अपयशी ठरतांना दिसून येत आहे. त्यामुळे नगर शहरात रोजगार, उद्योगधंदे मोठया प्रमाणावर नगर शहरात येतांना दिसून येत नाही. गुंडागर्दीचे राजकारण, नात्यागोत्यांच्या राजकारणात शहराचा विकास मात्र हरवत चालला आहे.

नाट्यगृहासमोरील स्टील गेले कुठे ? – महानगरपालिकेकडून सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात नव्याने नाट्यगृह उभारणीचे कामकाज सुरू आहे. या कामासाठी 8 कोटी 75 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. काम प्रगतीपथावर असतांना, या कामासाठी आणलेले स्टील अचानक कुठे गायब झाले, याचा शोध घेण्याची गरज आहे. स्टीलसह इतर साहित्य या ठिकाणी नसल्यामुळे नाट्यगृहाच्या निधीबाबत देखील अनेक प्रश्‍न उपस्थित होतांना दिसू येत आहे.

COMMENTS