Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज ठाकरेंचा पाठिंबा ‘मनसे’ का ?

एखाद्या राजकीय पक्षसमोर किंवा संघटनेसमोर जेव्हा कार्यक्रम नसतो, तेव्हा त्या पक्षातील कार्यकर्ते सैरभैर होतात, त्यामुळे कालांतरांचे ती संघटना, तो

युक्रेनची गोची आणि युरोपला संधी
ताई आणि भाऊंचे प्रमोशन की डिमोशन ?
दिरंगाईला चपराक

एखाद्या राजकीय पक्षसमोर किंवा संघटनेसमोर जेव्हा कार्यक्रम नसतो, तेव्हा त्या पक्षातील कार्यकर्ते सैरभैर होतात, त्यामुळे कालांतरांचे ती संघटना, तो पक्ष मोडकळीस येतो, तशीच अवस्था आजमितीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अर्थात राज ठाकरे यांची झाली आहे. खरंतर मनसेने लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता थेट महायुतीला पाठिंबा देण्याची केलेली घोषणा आपल्या कार्यकर्त्यांना निष्क्रिय बनवणारी आहे. खरंतर राज ठाकरे यांनी थेट महायुतीचा भाग होत निवडणूक लढवायला हवी होती. किंवा त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवत स्वतंत्र मनसेच्या इंजिन चिन्हावर निवडणूक लढवण्याची गरज होती. या निवडणूकीतून आपला उमेदवार निवडून येईल की नाही, हा नंतरचा मुद्दा राहिला. मात्र यानिमित्ताने कार्यंकर्त्यांना एक कार्यक्रम मिळतो, एक दिशा मिळते, मात्र ती दिशा मनसेची चुकल्याचे दिसून येत आहे.
खरंतर राज ठाकरे यांचे वक्तृत्व कमालीचे आहे. त्यामुळे त्यांच्या सभेला होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र आजपर्यंतच्या कारकीर्दीत राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी कमालीचे तणावात असल्याचे दिसून आले. कदाचित त्यांना त्यांचीच भूमिका पटत नसावी, मात्र वरून अदृश्यशक्तींचा असलेल्या दबावापोटीच ते बोलत असल्याचा त्यांचा चेहरा सांगत होता. खरंतर राज ठाकरे कुणाचीही भाड-भीड न ठेवता आक्रमक पद्धतीने समाचार घेणारे व्यक्तीमत्व. कारण ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे काय बोलावे, कोणती भूमिका घ्यावी, यासाठी ते कुणाला बांधील नाहीत, असे असतांना त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशीची भूमिका एका दबावात घेत असल्याचे दिसून येत होते. राज ठाकरे यांनी महायुतीचा भाग व्हावे, त्यांनी महायुतीकडून निवडणूका लढव्यायात, किंवा त्यांनी पाठिंबा द्यावा, ही त्यांची व्यक्तीगत भूमिका आहे, त्यात विरोध असण्याचे काही कारण नाही. मात्र राज ठाकरे जे करतात ते ठसक्यात करतात असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. मात्र ते व्यक्तीमत्व गुढीपाडव्याच्या दिवशी दिसले नाही. त्यादिवशीचे राज ठाकरे प्रचंड तणावात असल्याचे दिसून येत होते. कदाचित आपण घेत असलेली भूमिका आपल्या कार्यकर्त्यांना पटणार नाही, अशी भीती त्यांच्या मनात होती, असेच यातून दिसून येत आहे. राजकारणात भूमिका सातत्याने बदलतात, त्यात नवल नाही. बिहारसारख्या राजकारणात नितीशकुमार यांनी किती दिवसांत पलटी मारत किती युती आणि आघाड्या केला त्याचा इतिहास आपल्यासमोर आहेच. इंडिया आघाडीचे निमंत्रक होण्यापासूनचा प्रवास ते थेट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा नितीशकुमार यांचा इतिहास माहित असला तरी, नितीशकुमार कधी तणावात दिसले नाही. त्यांनी स्वच्छेने हा निर्णय घेतल्यामुळे ते भाजपसोबत जाण्यास खुश असल्याचे दिसून आले. मात्र राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देतांना त्यांच्या चेहर्‍यावर एक तणाव दिसून येत होता. तो तणाव नेमका तपास यंत्रणांच्या भीतीपोटी होता की अन्य कारण, याचे उत्तर समोर आले नसले तरी, कालांतराने ते समोर येईल यात शंका नाही. गेल्या पाच वर्षांपूर्वी थेट भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधात भूमिका घेणारे आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे यावेळेस मात्र केवळ मोदीजी पंतप्रधान व्हावे, त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला आजमितीस गरज आहे, यापोटीच आपण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी आपण इतरांच्या चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची गळ घातल्याचे दिसून येत आहे. कारण भाजप नेते बावनकुळे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे गळ घातल्याचा मुद्दा खोडून काढला असला तरी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने तो मुद्दा खोडून काढलेला नाही. त्यामुळे अनेक बाबी गुलदस्त्यात असल्या तरी आगामी काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील तेव्हा यातून अनेक गौप्यस्फोट होतील, यात शंका नाही.

COMMENTS