महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना हक्काचे थिएटर्स,स्क्रीन्स का नाही ?

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना हक्काचे थिएटर्स,स्क्रीन्स का नाही ?

सद्यस्थितीवर उत्कर्ष शिंदेचा सवाल

अभिनेता  ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत असलेला आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित सनी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मात्र सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमाच्या स्

‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
शहरातील 69 दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप
जातीनिहाय जनगणनेचा तिढा

अभिनेता  ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत असलेला आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित सनी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मात्र सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमाच्या स्क्रिनिंगचा प्रश्न उपस्थित झाला.  सनी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी काढलेल्या तिकिटाचे पैसे त्यांना परत देऊन थिएटर व्यवस्थापनानं शो रद्द केल्याची घटना घडली. यावर आता बिग बॉस फेम अभिनेता गायक उत्कर्ष शिंदेनं पोस्ट शेअर करत सद्यपरिस्थितीवर रोखठोक भाष्य केलं आहे. ‘आज मराठी सिनेमा ला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायच असेल तर समानतेचि वागणूक मिळायलाच हवी’. पुढे त्यानं अभिनेते दादा कोंडके यांचं उदाहरण देत म्हटलंय, ‘अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके यांच्या चित्रपटांना त्या काळी चित्रपटगृह मिळाली नव्हती बहुदा मुद्दाम गळचेपीच मराठी चित्रपटाची करायचा मनसुबा काहींचा तेव्हा होता. तोच प्रश्न तिच वेळ तेच विचार तिच कुचंबणा तिच डावलण्याची मानसिकता आजही तोंड वर काढतीये’.

COMMENTS