Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक सलोखा बिघडवणारे ते कोण ?

मुुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल

बुलडाणा/प्रतिनिधी ः ज्यांनी मराठा मोर्चांची हेटाळणी केली, ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी मुक मोर्चाला ’मुका मोर्चा’ असे संबोधले, तेच आता तिथे जावून ग

जिल्हाधिकारी देणार शासकीय रुग्णालयांना नियमित भेटी
टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

बुलडाणा/प्रतिनिधी ः ज्यांनी मराठा मोर्चांची हेटाळणी केली, ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी मुक मोर्चाला ’मुका मोर्चा’ असे संबोधले, तेच आता तिथे जावून गळे काढत आहे. मराठा समाज फार संयमी आहे, शांततेत असलेले आंदोलनात दगडफेक कुणी केली? सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे? तुम्ही राजकीय पोळू भाजू नका.’ अशी विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्र्यांनी ’साडे तीन हजार तरुणांना नियुक्त्या देण्याचे काम मी मुख्यमंत्री झाल्यावर केले.’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बुलडाणा येथे केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शुक्रवारची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यामध्ये दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? लाखा-लाखांचे मोर्चे निघाले. 58 मूक मोर्चे निघाले होते. लोक याला विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरु आहे. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होईल असे समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावे लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत का याची माहिती येत आहे, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मी 3 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठीक नाही. आपण चर्चा करू, असे मी त्यांना सांगितले होते. पण तरीही त्यांनी उपोषण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल, आदी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.’जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आले. आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचे घोडे मारले? जनता माझ्याबरोबर आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले. अशी टीका त्यांनी केली. रस्त्यावर उतरून काम करणारे आमचे सरकार आहे. ऑनलाईन किंवा फेसबुकवरुन काम करणारे आमचे सरकार नाही. त्यांच्या सरकारच्या काळात जाणीवपूर्वक प्रकल्प बंद पाडले. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसेच, ’गेल्या वर्षात 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. केंद्र सरकार नदी जोड प्रकल्पासाठी अनुकूल आहे. आम्ही ’लेक लाडकी’ ही योजना करत आहोत. 18 वर्षे होईपर्यंत तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील. असे त्यांनी सांगितले.

लाठीहल्ल्याचे समर्थन नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याचे आम्ही समर्थन करत नाही, जालन्यामध्ये घडलेल्या घटनेची गरज लागल्यास न्यायालयीन चौकशी होणार असून तिथले पोलिस अधीक्षक तुषार दोषा यांना मी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

COMMENTS