Homeताज्या बातम्यासंपादकीय

बहुरंगी लढतींमागे कोण : फडणवीस की पवार ! 

निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. देशात लोकसभा निवडणूकीच्या दिशेने सर्व पक्षांची लगबग सुरू झाली आहे. वेगवेगळे पक्ष या निवडणुकीत सक्रिय राहणार असल

माध्यान्ह भोजनातून विषबाधा, कॅग कडाडले!
सरकारच्या समितीला सर्वोच्च न्यायालयात नकार ! 
ओबीसी घटक आणि मराठा आरक्षण ! 

निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. देशात लोकसभा निवडणूकीच्या दिशेने सर्व पक्षांची लगबग सुरू झाली आहे. वेगवेगळे पक्ष या निवडणुकीत सक्रिय राहणार असले तरी ते प्रामुख्याने आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढवतील, असे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये दोन आघाड्या मुख्य आहेत; त्यातील पहिली सत्ताधारी पक्षांची एनडीए आघाडी आणि दुसरी देशातील काॅंग्रेससह अन्य विरोधी पक्षांची इंडिया आघाडी. इंडिया आघाडीचे घटक दल विखुरले गेले असले तरी उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा दोन्ही ठिकाणी आघाडी सुस्थितीत आहे, असे म्हणता येईल. या दोन आघाडींच्या व्यतिरिक्त काही पक्ष स्वतंत्र निवडणूका लढू पाहत आहेत.‌ त्यात ओबीसी राजकीय आघाडी ही ओबीसींची राजकीय अस्मिता घेऊन उभी राहिलेली नवी आघाडी मैदानात उतरत आहे.‌ ओबीसी आघाडीच्या मैदानात उतरण्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

त्यातून जनमानसात अशी चर्चा होऊ लागली आहे की, या आघाडीच्या मागे नेमके कोण आहे.‌ अजून पुरेसे थंड न पडलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आपण हे दररोज ऐकत होतो की, मराठा आंदोलन उभे करणारे नेमके कोण? या विषयावर अनेकांना शंका होती की, यामागे देवेंद्र फडणवीस आहेत; तर, बऱ्याच लोकांची शंका होती की, यामागे शरद पवार आहेत. परंतु, जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन स्वतंत्र राजकीय भूमिका घेत असल्याने त्यामागे मत विभाजन होण्याचा फायदा कुणाला? हा विचार केला तर अशा विभाजनाने काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसची मते विभाजित होतील, असे बहुतेकांचे मत आहे. त्या अर्थाने, ओबीसी राजकीय आघाडी जी स्वतंत्रपणे निवडणूका लढते आहे, यातून मतांचे विभाजन होणार आहे. कोणत्याही मत विभाजनाचा फायदा शेवटी सत्तेवर असणाऱ्या पक्षाला होतो, असा इतिहास आहे. ओबीसी राजकीय आघाडीच्या  मत विभाजनाचा फायदा मात्र नेमका कुणाला होणार, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अर्थात, ओबीसी समुदाय संख्या बहुल असल्याने त्यांचा उमेदवार विजयी देखील होऊ, हे नकारता येत नाही. तरीही, या आघाडी मागे नेमकं कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

विचारणाऱ्या लोकांना शंका येतेय ती देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची. महाराष्ट्रात राजकीय खेळ्या करणारी ही दोनच नावे प्रामुख्याने दिसतात. काॅंग्रेसमध्ये या तोडीच्या खेळी करण्यात विलासराव देशमुख माहिर होते.‌ वर्तमान काळात मात्र देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हीच नावे समोर येतात. त्यामुळे, लोकांच्या मनात महाराष्ट्रात होणाऱ्या कोणत्याही नव्या राजकीय प्रयोगामागे या दोघांमधील कोणीतरी एक असावा अशी शंका लोक घेतात. अर्थात, लोकांचे यात काही चुकले असे नाही. तर, कोणताही राजकीय अनुभव वा कार्य नसताना अशाप्रकारे एकाएकी राजकीय आघाडी महाराष्ट्रात सर्वच जांगावर उमेदवार देत असेल तर एवढे उमेदवार कसे मिळतात, हा लोकांना सतावणारा विषय असतो. 

ओबीसी राजकीय आघाडीने काल काही उमेदवारांची घोषणा केली असल्याने लोकांच्या मनात पुन्हा अशा शंका डोकावतील. अर्थात, हे देखील खरे आहे की, आज लोकांना, दोनच आघाड्या मैदानात असाव्यात असे वाटते. २०२४ च्या लोकसभा निवडणुका या निर्णायक मानल्या जात आहेत. संविधान रक्षणाची निवडणूक म्हणून या निवडणूकांचे वर्णन स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. काॅंग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी देखील हेच म्हटले आहे. लोकशाहीला आव्हान मिळालेल्या या निवडणूकांत दुरंगी लढत व्हावी अशी महाराष्ट्र आणि देश वासियांची भूमिका आहे. अशावेळी निवडणूक तिरंगी, चौरंगी होणार असतील तर त्यातून निवडणुकीत विरोधी पक्षांना काहीच फायदा होणार नाही, हे स्पष्ट दिसते. तरीही, विरोधी पक्षांकडून बहुरंगी लढती केल्या जाऊ शकतात का? हा प्रश्न आहे. 

COMMENTS