Homeताज्या बातम्यादेश

आम्ही रस्ते बांधण्यात तर, ते आमची कबर खोदण्यात व्यस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँगे्रसवर जहरी टीका

बंगळुरू/वृत्तसंस्था ः काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस

LOK News 24 I सुपरफास्ट महाराष्ट्र दुचाकी चालवण्याच्या वादातून तरुणाची हत्या l पहा LokNews24
पॅरोल वर सोडण्यात आलेल्या 360 कैद्यांना पकडण्याची विशेष मोहीम सुरु I LOKNews24
पुण्यात साडेचार लाखाचे कोकेन जप्त

बंगळुरू/वृत्तसंस्था ः काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणार्‍या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगे्रसवर केली.  बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे देशाला समर्पित केल्यानंतर ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सागरमाला आणि भारतमाला सारख्या प्रकल्पांनी कर्नाटक आणि देश आज बदलत आहे. जग कोविडशी झुंजत असताना, भारतानं पायाभूत सुविधांचे बजेट अनेक पटीने वाढवून मोठा संदेश दिला. 2014 पूर्वी काँग्रेस सरकारने गरीब कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आणि त्यांच्या विकासाचा पैसा लुटला, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

पंतप्रधान मोदींनी रविवारी म्हैसूर-खुशालनगर 4 लेन महामार्गाची पायाभरणी केली. सुमारे 4130 कोटी रुपये खर्चून 92 किमी पसरलेला हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बेंगळुरूशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आणि प्रवासाचा वेळ सुमारे 5 वरून फक्त 2.5 तासांपर्यंत कमी करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कर्नाटकात मंड्या आणि हुबली-धारवाड जिल्ह्यात सुमारे 16,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 275 अर्थात बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर सेक्शनचा सहा लेनचा प्रकल्प असलेल्या 118 किमीच्या बेंगळुरू-म्हैसूरू एक्सप्रेसवेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर मंड्या येथे बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या लाटेमुळे कर्नाटकात भाजप सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची ताकदही तिथे वाढते आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आण्इ नंतरच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. बेंगळुरू-म्हैसूर हा प्रकल्प एकूण 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे आणि त्यामुळे बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांवरून सुमारे 75 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

मंड्या हे जुन्या म्हैसूर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांपैकी एक आहे ज्यात म्हैसूर, चामराजनगर, रामनगरा, बेंगळुरू ग्रामीण, कोलार, चिक्कबल्लापूर, तुमाकुरू आणि हसन जिल्ह्यांचा समावेश आहे. विधानसभेच्या 61 जागा असलेला जुना म्हैसूर प्रदेश जेडीएसचा बालेकिल्ला आहे. या भागात काँग्रेसचीही मोठी ताकद आहे. वर्ष 2018 मध्ये, भाजपने किनारपट्टीवरील कर्नाटक आणि मुंबई-कर्नाटक प्रदेशांमध्ये अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली. तथापि, जुन्या म्हैसूर प्रदेश आणि हैदराबाद-कर्नाटक प्रदेशातील काही भागांमध्ये ते स्पष्ट बहुमताने कमी पडले.

COMMENTS