सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना ट्रकने सूनेला चिरडले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना ट्रकने सूनेला चिरडले.

वैजापूर शहरातील नवीन भाजी मंडईसमोर घडला हा प्रकार

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैजापूर शहरातील नवीन भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने एका महिलला चिरडले आहे. या अपघातात महि

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
रावणाचं दहन करताना झाला मोठा अपघात
नाशिकमध्ये विचित्र अपघातात 6 जणांचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैजापूर शहरातील नवीन भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने एका महिलला चिरडले आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रतिभा राजेंद्र चौधरी (40) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला तिच्या सासऱ्यांना बसस्थानकावर सोडण्यासाठी स्कुटीवर जात होती. मात्र जातानाच भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने उडविल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर सासरे किरकोळ जखमी झाले. ट्रकची धडक बसल्यामुळे महिला चाकाखाली सापडली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी व्यक्तीला स्थानिकांनी त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ट्रकचालक वैजापूर जवळील धाब्यावर ट्रक सोडून फरार झाला आहे.

COMMENTS