Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेमुदत संपावरील 15 हजारावर कर्मचार्‍यांना व्हॉटसअ‍ॅप नोटीस

सोमवारी हजर होण्याचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी ः जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेल्या सरकारी व निम सरकारी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद आणि महसूलच्या 15 ह

गंगापुरातील दिंडीचे नेवासाफाट्यावर उत्स्फूर्त स्वागत
अमृतवाहिनीच्या डॉ लोंढे ,डॉ. चव्हाण व डॉ. गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी ः जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेल्या सरकारी व निम सरकारी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद आणि महसूलच्या 15 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना व्हॉटसअ‍ॅपव्दारे कामावर हजर होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच कामावर हजर न होणार्‍या कर्मचार्‍यांना सोमवारी (20 मार्च) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी महसूल कर्मचार्‍यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे महसूल कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येवून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कर्मचार्‍यांनी काळे कपडे घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत व्हॉटसअ‍ॅप आणि ऑफलाईन पध्दतीने 14 हजार 194 जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना व महसूल विभागाच्या 950 कर्मचार्‍यांना कामावर तात्काळ हजर होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच गैरहजर असणार्‍या सर्व शासकीय कर्मचार्‍यांना त्यांच्या विभागाचे प्रमुख अथवा नियुक्त अधिकारी यांच्या सहीने नोटीस बजावण्यात आल्या असून कामावर हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. दुसरीकडे पहिल्या दिवशी हाताच्या बोटावर सुरू असणार्‍या शाळांपैकी 721 माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

मनपा कर्मचार्‍यांची माहिती मागवली – राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या महापालिकेतील कर्मचार्‍यांची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा सुरू आहेत का, याचीही माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी जुन्या पेन्शन योजनेसह इतर विविध मागण्यासाठी संप सुरू केला आहे. अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर सरकारने संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची माहिती मागवली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेकडूनही माहिती मागवली आहे. मात्र, महापालिकेचे कर्मचारी संपात सहभागी नसल्याचे व सर्व सुविधा सुरळीत सुरू असल्याचे महापालिकेतून कळविण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका शिक्षण मंडळातील दोन कर्मचारी मात्र या संपात सहभागी असल्याचे मनपाकडून पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.

COMMENTS