महाराष्ट्र ते अमेरिका : राज, अर्थ आणि सत्ताकारण!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र ते अमेरिका : राज, अर्थ आणि सत्ताकारण!

आज एकूण चार महत्वपूर्ण घटना राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडल्या त्याचा संयुक्त गोषवारा घेणे आवश्यक वाटते. ज्या चार महत्वपूर्ण घटना घ

आता कर्नाटकचेही शैक्षणिक धोरण !
अहमदनगरच्या पत्रकारितेला काळिमा फासणारे ते बोगस पत्रकार कोण ?
ईलेक्ट्राॅल बाॅण्डही फुसका बार ठरेल का ?

आज एकूण चार महत्वपूर्ण घटना राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडल्या त्याचा संयुक्त गोषवारा घेणे आवश्यक वाटते. ज्या चार महत्वपूर्ण घटना घडल्या त्यातील पहिली साहजिकच शिंदे – फडणवीस सरकारचा तब्बल सव्वा महिन्यानंतर झालेला मंत्रीमंडळ विस्तार. या विस्तारात दोन नावांवर काहीसा खल होतोय, ज्यात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश होतो. परंतु, ज्या पद्धतीने त्यांना मंत्रीमंडळात सामावून घेतले ते पाहता फारसा वाद उफाळून येणार नाही, असे दिसते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार नंतर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने मजबूतीने पाऊल उचलले असतानाच तिकडे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती तोडण्याची घोषणा केली आहे. अर्थात, अशी घोषणा करण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भाजपबरोबरची युती तोडूनही आपणच मुख्यमंत्री असणार, याची पूर्ण तजवीज करून घेतली आहे. म्हणजे, ज्या राष्ट्रीय जनता दला बरोबर एकदा युती तोडून भाजप बरोबर सरकार बनवले होते; आता त्याच जनता दल बरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपशी गठबंधन तोडले. म्हणजे नितिशकुमार गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून बिहारमध्ये एकछत्री सत्तेचा अंमल चालवित आहेत. या सर्व धरसोडीत नितीशकुमार यांनी तत्वाच्या राजकारणाशी काडीमोड घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. अठ्ठावीस वर्षाच्या सत्ताकाळात नितिशकुमार यांनी राज्याच्या सत्ताकारणात खूपच मजबूत पकड घेतली आहे.        महाराष्ट्र आणि बिहारचे सत्ताकारण वेगवान पध्दतीने पुढे सरकत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन घटना फारच लक्ष्यवेधी ठरल्या आहेत. त्यातील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा राज्यातील पामबीच रोडवरील मार-ए-लॅगो या निवास कम रिसाॅर्टवर अमेरिकेच्या सर्वोच्च तपास यंत्रणा असणाऱ्या एफबीआय ( फेडरल ब्यूरो ऑफ अमेरिका) या संस्थेने धाड टाकली आहे. या धाडी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, अशा प्रकारची धाड म्हणजे अमेरिकेला तिसऱ्या जगाच्या रांगेत उभे करण्याचे द्योतक आहे, असे सांगत २०२४ च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुक लढविण्यापासून वंचित ठेवण्यासाठी ही धाड टाकली गेली, असा आरोपही त्यांनी केला. मात्र,  एफबीआय च्या सूत्रानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी पीआर‌ए या अध्यक्षीय रेकाॅर्ड कायद्यानुसार मावळत्या अध्यक्षांनी अध्यक्ष कार्यालयाचे सर्व दस्तऐवज राष्ट्राध्यक्ष कार्यालयातच सोडले पाहिजे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लॅगो या त्यांच्या रिसाॅर्टमध्ये यापूर्वी १५ पेट्या भरतील एवढे राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील दस्तऐवज सापडल्याचा दावा पामबीच स्टेट चे ऍटर्नी डेव ऍरोनबर्ग यांनी केला आहे. अर्थात, अमेरिकेच्या हाऊस प्रेसिडेंट नॅन्सी पोल्सी यांचा चीन आणि तैवान दौरा आटोपल्यानंतर ही कारवाई केली गेली आहे. त्यामुळे, चीन – अमेरिका संबंधाचा यात काही भाग आहे का? असाही एक सुप्त भाग यात असावा का, अशी शंका आंतरराष्ट्रीय जाणकार घेत आहेत. परंतु, त्याचवेळी चीनची सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या अलीबाबा ग्रुपने आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.    अर्थात, या चार घटना. ज्यात महाराष्ट्र आणि बिहार यांच्या सत्ताकारणाचा भाग कुठे ना कुठे एकमेकांशी निगडित वाटतो तसाच अमेरिकेतील एफबीआय ने ट्रम्प यांच्या घरी टाकलेली धाड आणि चीनच्या एका कंपनीत झालेली घाऊक नोकर कपात आणि अमेरिकेच्या हाऊस प्रेसिडेंट यांचा नुकताच आटोपलेला चीन – तैवान दौरा यात काही संबंध असावेत का, असा एक संशय चर्चेला येत आहे. राजकारण आणि त्या माध्यमातून होणारे सत्ताकारण हे जागतिक पातळीवर आता एकमेकांशी निगडित राहू लागले आहे, अशावेळी त्यावर सारासार विचार करणे आवश्यक आहे!

COMMENTS