Homeताज्या बातम्यासंपादकीय

तिच्या सुरक्षेचे काय ?

पश्‍चिम बंगालमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देखील व्यवस्था कशी काम करते, याचा ताजा अनुभव असता

जागतिक मंदीचे धक्के !
वाढते अपघात चिंताजनक…
सरकारी निर्णय राज्यास मारक

पश्‍चिम बंगालमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देखील व्यवस्था कशी काम करते, याचा ताजा अनुभव असतांनाच बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतरदेखील व्यवस्था कशी काम करते, याचे मूर्तीमंत उदाहरण बघायला मिळाले आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यातील साम्य एकच आहे. कोलकात्यातील तरूणीवर अत्याचार करून हत्या होते, याची संपूर्ण माहिती हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयाला माहिती असतांना देखील ती माहिती त्या तरूणीच्या पालकांना दिली जात नाही. तर प्राथमिकदर्शनी तिचा खून झाल्याचे भासवण्यात येते. इतकी भयावह घटना घडली असतांना देखील मुलींच्या पालकांना मुलीचा मृतदेह बघू दिला जात नाही, कित्येक तास त्यांना ताटकळत ठेवण्यात येते. त्यानंतर कितीतरी तासांनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर येते, अर्थात जनक्षोम उसळल्यानंतर. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ, त्यानंतर गंभीर कलमे लावण्यासाठी बरीच टाळाटाळ केली जाते. त्यानंतर श्‍वविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिच्यावर चार-पाच जणांनी बलात्कार केल्याचे समोर येते. वास्तविक पाहता तिच्या शररीरावर इतक्या भयावह जखमा असतांना, पोलिसांनी आणि कॉलेज प्रशासनाने तत्परता दाखवत आरोपींवर कारवाईचा बडगा उगारण्यास काय हयगय केली हा महत्वाचा प्रश्‍न आहे.

वास्तविक पाहता तिच्यासोबत शेवटच्या क्षणी काय झाले असेल, मृत्यूच्या किंकाळ्यांनी ती आवाज देत असतांना तिच्या मदतीला कुणीच धावून आले नाही. मात्र तिच्या मृतदेहाची देखील विटंबना इथल्या व्यवस्थेने केली. खरंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला आहेत. आणि ममता बॅनर्जी या सक्षम महिला असतांना त्यांनी देखील या महाविद्यालयाच्या प्राचार्य, आणि प्रशासनाविरोधात थेट कारवाईचा बडगा का उगारू शकल्या नाहीत. अखेर या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरी घटना महाराष्ट्रातील बदलापूर येथील आहे. एक चार वषार्र्ंची तर दुसरी सहा वर्षांची चिमुरडी, या दोन चिमुरडीवर त्या 23-24 वर्षांच्या सफाई कर्मचार्‍यांने अत्याचार केले. खरंतर या मुलींचा विचार केल्यास चार वर्षांची मुलगी नर्सरी, आणि दुसरी मुलगी सीनियर केजी किंवा पहिल्या वर्गात असेल. या मुलींना वाशरूमला नेण्याची जबाबदारी या विकृत माणसावर सोपवली होती. ज्याला माणूस देखील म्हणावयची लाज वाटते. अशा व्यक्तीवर. खरंतर या चिमुरड्यांनी आपल्या आजोबांना याबद्दलची हकीकत सांगितल्यानंतर आणि डॉक्टरकडे उपचारासाठी घेवून गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. हा प्रकार इतका गंभीर असतांना पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात 12 तास लावले, असा गंभीर आरोप या चिमुरड्यांच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे कोलकाताप्रमाणेच इथे देखील व्यवस्थेचा भयावह अनुभव पदरी पडतो. एकतर त्या पीडित आहे, अशावेळी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास करण्याची वेळ असतांना पोलिस जनक्षोम उसळू देण्याची वाट पाहत होते का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. खरंतर याप्रकरणी त्या पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली केली आहे. शिवाय अनेक अधिकार्‍यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांना ती मुलगी आपली समजून तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत का होवू नये, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. इतकी सगळी टाळाटाळ झाल्यानंतर बदलापुरची जनता रस्त्यावर उतरली. आणि त्यांनी रेल रोको करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. हा जनक्षोम शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर आंदोलकांनी देखील हातात दगड घेतले. हा संपूर्ण प्रकार कायदा व सुव्यवस्थेची धिंडवडे उडवणारा होता. त्यामुळे शाळा व्यवस्थांपनाकडून मुलींच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते की नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. शालेय विभागाने शाळांची तपासणी करून, सुरक्षेच्या त्रुटी असणार्‍या शाळांविरोधात गंभीरपणे कारवाई करण्याची खरी गरज आहे. मात्र व्यवस्था झोपलेली असते, तेव्हा अशा घटना घडतात. त्यामुळे अशा व्यवस्थेला जागे करण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS