अतिक्रमणात धोंडेवाडी अर्धे गाव उध्वस्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिक्रमणात धोंडेवाडी अर्धे गाव उध्वस्त

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी   गावातील गायराण जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली १३५ घरे दि. ७  रोजी  मोठ्या पोलीस फौजफ

सर्वसामान्यांचे प्रेम हेच खरे समाधान ः प्राचार्य शिवाजीराव भोर
आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी
प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी   गावातील गायराण जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली १३५ घरे दि. ७  रोजी  मोठ्या पोलीस फौजफाट्या सह पाडण्यात आली आहेत.जवळके आणि धोंडेवाडी ही लागुन असलेली दोन गावे. त्यातील धोंडेवाडी गावातील निम्मी वस्ती ही गायराण जमीनीवर वसली होती. त्यात सुमारे चारशे लोकसंख्या असलेली एकशे पत्तीस घरे वसली होती. विशेष म्हणजे यात अनेक बंगल्याचाही समावेष होता. गेल्या अनेक वर्षा पासुन हे सगळे येथे गुण्या गोवींदाने नांदत होती.
मात्र गावातील पाझर तलावातील अधिग्रहीत जमीनीच्या विहीरी बाबतच वाद उद्भवला आणि ह्या विहीरी बुजविण्याची मागणी जोर धरु लागली. त्यात राजकारणही घुसल तो वाद काही दिवस चालुन अखेर विहीरी बुजल्या गेल्या. मात्र याच वादा दरम्यान धोंडेवाडीतील निम्मी घरे ही गायराण जमीनीवर बांधलेली गेली असल्याने तीही काढावीत ही मागणी पुढे आली. यावर आधी हायकोर्टात नंतर सुप्रिम कोर्टात दावे दाखल झाले. यात न्यायालयाकडुन ही अतिक्रमणे काढण्या संदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीसही देण्यात आल्या होत्या. आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने काही कुटुंबांनी स्वतःहून आपली अतिक्रमित घरे खाली केली तर उर्वरित घरे आज प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात उध्वस्त केली.धोंडेवाडीत अर्ध्याच्या वर अतिक्रमण हटाव झाल्यामुळे अर्धेगाव नामशेष झालाय. त्या मुळे गावातील चारशे कुटुंबे उघड्यावर आल्याने या कुटुंबाने मोठी चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
गावातील पाझर तलावा वरुन सुरु झालेल्या वादाचा परिणाम सुमारे चारशे कुटुंबियांना भोगावा लागल्याच या प्रकरणा वरुन दिसुन आलयतालुक्यातील गायरान जमीनीवरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात हटविवेल्या या घटनेने राज्यासह जिल्ह्यातील इतर गावातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. 

COMMENTS