Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजमध्ये उपजिल्हा रुग्णालयात चालले तरी काय?

रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य

केज प्रतिनिधी - केज येथील उपजिल्हा रुग्णालयात चाललय तरी काय? रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचा

बाल चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणे काळाची गरज
गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचा समारोप
एटीएममध्ये हातचलाखी, अडीच लाख लांबवले

केज प्रतिनिधी – केज येथील उपजिल्हा रुग्णालयात चाललय तरी काय? रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठांचा अंकुशच नाही का? असे यावरून दिसून येत आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,सध्या उलटी,संडास, खोकला,थंडी-तापीच्या आजाराचे प्रमाण जास्त वाढले आहे.थंडी तापी मुळे टायफाईड,पेशी वाढणे तर काही रुग्णाच्या पेशी कमी होणे आणी उलटी संडास मुळे गॅस्ट्रो यासारखे अनेक साथीच्या आजारांची साथ सध्या चालू आहेत.केज शहरा सह तालुक्यातील अनेक रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्या साठी मोठ्या प्रमाणात येतात तर काही रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात अडमिट केले जाते तर काही रुग्णांना रेफर केले जाते.उपचार घेण्यासाठी अडमिट केलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक नाश्ता व जेवण रुग्णालयाच्या परिसरात करतात.परंतु त्या ठिकाणी सर्वत्र खराब झालेल्या कॅरीबॅग शिळ्या खराब झालेल्या भाकरी, चपाती,भात,तसेच गुटखा,पुड्यासह अनेक गुटखा खाल्ल्याच्या रिकाम्या पुड्या व झाडांचा पाला पाचोळा इत्यादी कचरा असतो.रुग्णालया तील रुग्णांना जेवण दिले जाते ते जेवण बनविण्याचे ठिकाण हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक जेवताना बसतात तेथेच आहे.
परंतु त्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या भाज्या,भात व खराब झालेले जेवण आणी घाण पाणी उघड्यावर टाकले जाते.सदरील खराबजेवण व घाण पाणी उघड्यावर एका खड्ड्यात साठवून रस्त्याने वाहते या घाण पाण्यावर डास,चिलट, मच्छर बसलेले असतात त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधीचा वास व परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक परेशान आहेत.सदरील घाणीमुळे रुग्णाचे आजार लवकर बरे होण्यापेक्षा या घाणीमुळे रुग्णाच्या आजारात वाढ होत आहे अशी चर्चा रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऐकण्यात येत आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक हे इमर्जन्सी विभागाच्या समोर बसलेले असतात व सुरक्षा रक्षक स्वतःच तंबाखू व गुटखा खाऊन त्या ठिकाणी थुंकून घाण करीत आहेत.सुरक्षा रक्षक यांच्या रूम जवळ गेट नजीक पाणी साचलेले असून त्या ठिकाणी चिलट,डास,मच्छर बसलेले असतात या सर्व घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णाचे नातेवाईक देखील आजारी या ठिकाणी पडतात असे नातेवाईकाचे म्हणणेआहे.उपजिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णास या ठिकाणी औषध,गोळ्या,सलाईन रुग्णास लागणारे वेगवेगळे औषधे उपलब्ध नसतात असे रुग्ण व त्यांचे नातेवाईकांकडून बोलले जात आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास येणार्‍या रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांना कार्यरत डॉक्टर व कर्मचारी हे व्यवस्थित उपचार न करता त्यांना उद्दटपणे बोलत आहेत व रुग्णास आणी नातेवाईकांना शुल्लक आजारासाठी रेफर केले जातअसल्याची चर्चा आता रुग्ण आणी नातेवाईकातून ऐकण्यास मिळत आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठांचा अंकुश राहिला नाही असा सवाल रुग्ण आणी त्यांच्या नातेवाईकाकडून उपस्थित होत आहे व तशी चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे.

COMMENTS