मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आवाज बुलंद करण्याची गरज : श्रीमंत शाहू छत्रपतीं

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आवाज बुलंद करण्याची गरज : श्रीमंत शाहू छत्रपतीं

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती आपल्याला समजायला हवी. त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा पटवून द्यायला हवा.

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक
अण्णा भाऊ साठे योजनेच्या 1.65 कोटींच्या कामास मान्यता
घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू

कोल्हापूर : “मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती आपल्याला समजायला हवी. त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा पटवून द्यायला हवा. दिल्लीत भाजप आज बहुमतात आहे. पंतप्रधानपदी तिथं नरेंद्र मोदी बसलेत त्यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज पोहोचायला हवा. आपण बलाढ्या आहोत असं समजून दिल्लीत आवाज पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच दिल्लीत पाठपुरावा करायला हवा. पंतप्रधानांनी जर ठरवलं तर ते सगळं करू शकतात”, असं श्रीमंत शाहू छत्रपती कोल्हापुरात मूक आंदोलनाच्या वेळी म्हणाले.  

 कोल्हापुरात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्यातील अनेक नेते, आमदार आणि खासदारांनी आंदोलनाला उपस्थिती लावली. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपस्थितांना संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आवाज बुलंद करण्याची गरज व्यक्त केली. कोल्हापूरात झालेल्या या मूक आंदोलनात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

COMMENTS