Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची चौकशी करा

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील काशीदवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील काशीदवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, काशीदवाडी येथील जलजीवन योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार इंजिनिअर व गुत्तेदार यांच्या संगणमताने होत असल्याचे उघडकीस आले आहे.सदरील कामात विहीर पाईपलाईन या योजनेसाठी केंद्र शासनाकडून करोडो रुपयाचा निधी आला खरा पण गुत्तेदार व इंजिनियर यांच्या संगनमताने बोगस होत असल्याचे दिसून येत आहे.सदरील विहीरीचे कडे टाकण्याचे काम चालू असताना गावकर्‍यांनी या ठिकाणी पहाणी केली असता सदरील कड्यांमध्ये भले मोठमोठे गोटे व चिरे दिसूनआल्याने हे काम थांबवण्यात आले असून हे काम गणेश वजीनाथ वायभट एजन्सीला शासनाने काम दिलेले आहे.सदरील कामाचे इंजिनियर यांना मोबाईल दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता इंजिनिअर साहेबांनी मोबाईल उचलला नाही यावरून असे दिसून येते की, इंजिनियर व गुत्तेदार यांचा मनमानी कारभार चालू आहे सदरील पाईपलाईन चे काम ही निकृष्ट दर्जाचे झाले आहे तरी याकामाची केंद्रीय स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारेजिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी अधिकारी बीड,अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड,उप अभियंता पाणीपुरवठा विभाग केज यांनादिलेल्या निवेदनात ग्रामस्थांची मागणी केली आहे.
या निवेदनावर अविनाश कदम,ऋषिकेश कदम, कल्याण जाधवर,चंद्रसेन जाधवर,रामभाऊ कदम, श्रीमंत कदम,अशोक कदम,रामहरी कदम, आनंदराव कदम,भारत कदम,बबन जाधवर, वेंकट कदम,विजय जाधवर,रमेश जाधव, परमेश्वर जाधवर,बबन जाधवर यांच्यासह गावातील 56 नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाले परंतु देशाचा चालू असलेला विकास पाहून असं वाटते की,आजही इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा अशी या राज्यकर्ते आणी प्रशासनाच्या कारभार बोगसगिरी,दादागिरी यावरून दिसून येत आहे असे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.प्रशासन राजकीय नेते हे अनेक ठिकाणच्या जल जीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या कामात बोगसगिरी करत असल्याचे समोर येत आहे.आपल्या डोळ्या समोर असे बोगस काम होत असताना प्रशासना तील अधिकारी व भ्रष्ट मतदार यांच्या संगनमताने कारभारातून जल जीवन या कामाच्या पाहणी अंती असे निदर्शनास येते की, गुत्तेदार जगाव प्रशासना तील कर्मचारी जगाव आणी सर्वसाधारण जनतेच्या नावावर निवडून आलेले पुढारी यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? असेच यावरून दिसून येते आहे.केज तालुक्यात नव्हे तर देशात चालू असलेल्याजलजीवन कामाचा केंद्रीय पथका कडून याची तपासणी व्हावी व कर्तव्यदक्ष अधिकारी जेणेकरून तुकाराम मुंढे अशा कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी या कामाची पाहणी केल्यास प्रशासनातील अधिकारी व गुत्तेदार एकही काम इस्टिमेट प्रमाणे झालेले दिसून येणार नाही माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आपण शासनाचा व गोरगरीब जनतेचा आपल्या थोड्याशा मोबदल्यामुळे करोडो रुपयांच्या योजना बोगस होत चालले आहेत.
हे केज तालुक्यातील काशीदवाडी येवता जलजीवन कामाच्या होत असलेल्या कामावरून दिसून येत आहे.

COMMENTS