Homeताज्या बातम्याविशेष लेख

आम्हाला, पोलिसांच्या नजरा चुकवायला आवडतात !

होय, आम्हाला पोलिसांच्या नजरा चुकवायला आवडतात. कारण आम्ही गाडीवर जातो , महत्वाची कामे असतात. समोर त्यांना उभे बघून आम्ही शिव्या देतो. मनात काय का

बीबीसीला दिल्ली हायकोर्टाचे समन्स
Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)
कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने लस घ्यावी – राजेश टोपे यांचे आवाहन

होय, आम्हाला पोलिसांच्या नजरा चुकवायला आवडतात. कारण आम्ही गाडीवर जातो , महत्वाची कामे असतात. समोर त्यांना उभे बघून आम्ही शिव्या देतो. मनात काय काय ते बोलतो। दुर्दैवाने त्यांनी गाडी थांबवलीच तर मग विषयच सोडा ! 

आणि नजर चुकवून त्यांच्या जवळून निघून गेल्यावर असं स्वर्गात गेल्यागत आनंद होतो बरका ! म्हणूनच अजूनही आमचे आणि पोलिसांचे काही तितकेसे पटत नाही राव . आमचा विषयच सोडा तुम्ही तिथे उभे रहा आणि आम्हाला बिनधास्त पणे जाऊद्या म्हणजे झालं !मग आम्ही खुश ! आणि अजून एक तुम्ही बघुन न बघितल्याचा आव आणतात ना मग तेवढ्या वेळेत आम्ही आपणास पास वा जवळून निघून गेल्यावर काय तो आनंद ? वा…वा.. असो ।

खरच हे भीषण वास्तव आहेत आजच्या तरुणाईचं ! पोलिसांना सहजच बघून मजाक करणारी मंडळी काही कमी राहिली नाहीत. त्यांच्याकडे बघून आम्हास काहीच नाही म्हणजे काय तेच समजत नाही राव ! सिग्नल वर आपली दिवटी बजावत असतांना चांगले वाईट अनुभव हा फक्त शांत उभे राहिल्यावर समजते जे वास्तवात आहेत. सध्या वाईट परिस्थिती ही सिग्नलवरील पोलीस कर्मचारी यांची आहेत. ते समोर असो वा नसो आम्ही चकाट्या मारत सिग्नल क्रॉस करतो. १० ते १५ सेकंद अगोदर निघून जातो वा मध्येच आमचा शक्तिमान वा स्पायडर मॅन जागा होऊन आम्ही पोलिसांसह सिग्नललाच गुंगारा देऊन निघून जातो.  मला सांगा आपण एवढं करू शकतो मग प्रशासन यांना इथे कशाला उन्हा पावसात का  उभे करत असावे असे काही प्रश्न आपणांस पडतात की नाही ? की नुसतच त्यांनी पकडायच मग लगेच मामाला भाऊ वगैरे आत्या माऊशी यांना फोन का ? त्यांनी तुमची गाडी फोडल्याचं तर एवढं वाईट पाप नाही केलं ? केलं तेव्हा बघू  मुळात हा विषयच सर्व कृती होण्या अगोदर च्या आहेत ते उभेच असतात तर सुसाट पळणाऱ्या बाईक खतरनाक आहेत हो एकदम खतरनाक. असो…

प्रवास करणाऱ्यानो तुम्ही असेच वागत राहिल्यास त्यांचे काहीच काम नाहीत का तिथे उभे राहण्याचे त्यांनी थांबवल्यास थांबा आपली अडचण सांगा ? परंतु सिग्नल वर वा रस्त्यावर असे स्टंट करू नका जे नाहक त्रास वाढवून ठेवतात. ती आपलीच माणसे असतात अरे जी आपल्या गाडीमधून उत्पन्न होणाऱ्या कार्बनडाय दिवटी बजावत असताना आपल्या फुफुसात घेत असतात. पण नाहीच आम्ही एवढे शहाणे आहोत की बोलतोच त्यांना घाबरतच नाहीत त्यांना ! त्यांचा जागेवर किकमारून पगार काढतात ही मानसिकता तुम्हाला आम्हाला सर्वानाच गोत्यात आणणारी आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करा नजरा चुकऊन जाऊ नका.काही क्षण त्यांच्या सोबत ठीक बोला अज्ञानात राहू नका मात्र ज्ञानात रहा ही सोजवळ अपेक्षा त्यांनाही आम्हालाही. 

साधारण १५ ते २५ वयोगटातील तरूणाई ही कॉलेज ला जातात म्हणे ! आपल्या बाईकवर प्रियसीला देखील सोबत घेऊन जातात. त्यामुळे पोलिसांपुढे विविध समस्यां उत्पन्न होत आहेत त्यामुळे आई वडील यांनी देखील आपल्या तरूणाईकडे लक्ष देण्याची वेळ आहेत। नाहीतर वेळ निघून गेल्यावर नाशिक पोलीस दप्तरी क्राईम च्या नोंदी वाढतांना दिसतात , यात शंका नाहीत.  असो. पोलीस आपल्या सोबतच असतात आणि राहतात त्यांना सहकार्य करा जीवन घडवा.  जय हिंद !! 

योगेश रोकडे नाशिक  ९४२२८९२१९८

COMMENTS