Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देणगी दर्शन रांगेचे फेर नियोजन

त्र्यंबकेश्वर - देणगी दर्शन रांगेचे फेर नियोजन आज सोमवारी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून  करण्यात आले आहे. नवीन नियोजन नुसार देणगी दर

बंडखोर आमदारांना दिलासा ; विधानसभा उपाध्यक्षांना “सर्वोच्च” नोटीस
पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 
कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदी अब्दुल कादर

त्र्यंबकेश्वर – देणगी दर्शन रांगेचे फेर नियोजन आज सोमवारी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून  करण्यात आले आहे.

नवीन नियोजन नुसार देणगी दर्शन 200रुपये प्रति मानसीभरून दर्शन घेण्यासाठी जे भाविक रांग लावतील त्यांना रांगे नजीक तिकीट मिळेल.थोडक्यात तिकीट घ्या व मंदिरात दर्शन घ्या दर्शन असे नियोजन आहे फेर नियोजन माहिती विश्वस्त कैलास घुले यांनी दिली

 नगरपालिकेच्या शिवनेरी धर्मशाळेपासून अलीकडे त्र्यंबकेश्वर मंदिर नजिक पूर्व दरवाजा दर्शन बारीकडे जाताना पेंडॉल मध्ये दर्शन बारीत देणगी दर्शन घेणारा भाविक रांगेने जाईल. मंदिरा नजीक जाताच त्याला  तिकीट घेता येईल एका व्यक्तीला एकच तिकीट मिळेल तेथून तो भाविक महाद्वार कडे येईल. व

मुख्य मंदिरात दर्शन घेईन अर्थात रांगेने.

परिणामी मंदिरासमोर कारंजा समोर होणारी गर्दी मोठी कमी होईल .देणगी तिकिटांचा काळाबाजार होतो या म्हण्याला आता वाव राहणार नाही असे दिसते. पेड दर्शन रांगेतील भाविक मंडप मध्ये राहिल्याने त्याला ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होनेस मदत होईल. वरील नियोजन बाबत  पाहणी करीत विश्वस्त कैलास घुले यांनी सूचना संबंधितांना दिल्या. या वेळी मंदिर ट्रस्ट अधिकारी व सुरक्षा गार्ड हजर होते.

COMMENTS