Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

४५ गावांच्या पाणीपुरवठ्याचे स्वागत; मात्र १३ गावांच्या योजनेवर परिणाम नको : काकडे

शेवगाव : शेवगाव–पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी १२ मार्च रोजी सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे शेवगाव तालुक्या

कपीलधार देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप; देणगी निधी अपहार,बालविवाहास परवानगी,जैसे थे आदेशाचा भंग, या विषयाची चौकशी करून कारवाई करा-संदीपान चव्हाण,रमेश घुमके
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी : मंत्री उदय सामंत

शेवगाव : शेवगाव–पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी १२ मार्च रोजी सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे शेवगाव तालुक्यातील २० आणि पाथर्डी तालुक्यातील २५ गावांना पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्याचे स्वागत करतानाच या निर्णयामुळे आधीच मंजूर असलेल्या १३ गावांच्या पाणी प्रश्नावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची शंका शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांनी व्यक्त केली.

शनिवार, दि. १४ रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काकडे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या वेळी तालुक्यातील विविध गावांतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना काकडे म्हणाले की, शेवगाव तालुक्यातील १३ गावांच्या पाणी प्रश्नासाठी गेल्या दोन पिढ्यांपासून संघर्ष सुरू असून शासनाने या योजनेसाठी मंजुरीही दिली आहे. जायकवाडी धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून टप्पा क्रमांक एकसाठी सुमारे १.६ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे, नवीन गावांच्या पाण्याच्या उपलब्धतेतून दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत आणखी ४५ गावांना पाणी देण्याचा प्रस्ताव मांडल्यास आधीच मंजूर असलेल्या १३ गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या वरील 45 गावाच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही अगोदरच राज्याचे जलसिंचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात पत्र दिलेले आहेत. वरील गावांना पाणी मिळावे अशी भूमिका आमचीही आहे.

 काकडे पुढे म्हणाले की, नवीन ४५ गावांच्या पाणी योजनेला आमचा विरोध नाही; मात्र आधीच मंजूर असलेल्या १३ गावांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येऊ नये. या संदर्भात आमदारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत असून याबाबत शासनाकडून स्पष्टता आवश्यक आहे.

 या प्रश्नाबाबत जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले. भविष्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यात आल्यास २५ गावांच्या पाणी प्रश्नालाही तोडगा निघू शकतो; मात्र सध्या १३ गावांच्या पाण्याच्या प्रश्नात अडथळा येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

 या पत्रकार परिषदेस रंगनाथ ढाकणे, भाऊसाहेब बोडखे, अमोल टेकाळे, संजय काकडे, नामदेव ढाकणे, लक्ष्मण गवळी, राम पोटफोटे, ज्ञानदेव वीर, श्रीधर धावणे, विक्रम काकडे, अशोक झिरपे, अजिनाथ धावणे, शेषराव टेकाळे, वामन जवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS