Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी मांजरा प्रकल्पातून पाच बॅरेजेसमध्ये सोडले पाणी

लातूर प्रतिनिधी - उन्हाळी हंगामाकरिता मांजरा नदीवरील बॅरेजेसमध्ये मागणीनुसार आवश्यक परिगणना करून आगाऊ स्वरूपात सिंचन पाणीपट्टी भरणा करून पाणी सोड

लोक म्हणाले पिऊन पडलाय, त्याने ओळखलं पोलिसाला हार्ट अटॅक आलाय
खुतमापुर येथील मनोज पाटील  यांची पोस्टल असिस्टंट पदावर नियुक्ती
लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले ; गौण खनिजमधून सर्वाधिक 103 टक्के वसूली

लातूर प्रतिनिधी – उन्हाळी हंगामाकरिता मांजरा नदीवरील बॅरेजेसमध्ये मागणीनुसार आवश्यक परिगणना करून आगाऊ स्वरूपात सिंचन पाणीपट्टी भरणा करून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये झाला होता. त्यानुसार मांजरा नदीवरील पाच बॅरेजेसची 20 लाख 73 हजारांची सिंचन पाणीपट्टी भरताच पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यात आले आहे. या पाच बॅरेजेसमध्ये आता 8.858 दलघमी पाणीसाठा झाला आहे.
मांजरा नदीवरील ल्हासरा, बोरगाव-अंजनपूर, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा-पोहरेगाव या पाच बॅरेजेससाठी पाणी सोडण्यात आले आहे. ल्हासरा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता 1.136 दलघमी आहे. त्यासाठी 1.394 दलघमी पाणी सोडले आहे. टाकळगाव 1.408, वांजरखेडा 3.226, वांगदरी 1.292, कारसा-पोहरेगाव 1.538 असे एकूण 8.858 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. .195 रुपये प्रतिघनमीटर या प्रमाणे पाणी देण्यात आले आहे. त्यानुसार 20 लाख 73 हजार रुपयांची सिंचन पाणीपट्टी भरणा झाला आहे. त्यानंतरच पाणी सोडण्यात आले आहे.


धरणात उपलब्ध पाणीसाठा असा – मांजरा धरणात सद्य:स्थितीत एकूण पाणीसाठा 152.056 दलघमी आहे. यातील 47.130 दलघमी मृत पाणीसाठा असून, 104.926 जिवंत पाणीसाठा आहे. या जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी 59.29 आहे. त्यातील 8.858 दलघमी पाणी बॅरेजेससाठी देण्यात आले आहे.


बॅरेजेसनिहाय पाणीपट्टी वसुली – ल्हासरा, पोहरेगाव-अंजनपूर, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा-पोहरेगाव या बॅरेजेसना पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे. बॅरेजेसनिहाय पाणीपट्टी वसुली करून अहवाल विभागीय कार्यालयास सादर करण्यात आला आहे. दरम्यान, बॅरेजेसमध्ये पाणी सोडताना व सोडण्यापूर्वी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. मागणी आल्यानंतर अन्य बॅरेजेससाठीही पाणी सोडले जाणार आहे. टाकळगाव-देवळा बॅरेजेससाठी 1.91, वांजरखेडा 3.60, वांगदरी 0.840 आणि कारसा पोहरेगावसाठी

COMMENTS