Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई मेट्रोच्या डब्यात पाणीगळती

मुंबई : मुंबई आणि शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्‍वभूमीवर मुंबई मेट्रोतील संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियाव

अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

मुंबई : मुंबई आणि शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्‍वभूमीवर मुंबई मेट्रोतील संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोच्या डब्यात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला, जो पाहून नेटकरी हैराण झाले. दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. मात्र, मुंबई मेट्रोचा हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. व्हिडिओत दिसत आहे की, प्रवासादरम्यान अचानक मुंबई मेट्रोच्या डब्यात अचानक पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाली. त्यानंतर प्रवाशांनी संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून शेअर केला.

COMMENTS