Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव नगरपरिषदेकडून मतदान स्पर्धेचे आयोजन ः मुख्याधिकारी जगताप

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील गणपती व दुर्गादेवी उत्सव मंडळे, सार्वजनिक व्यायाम शाळा, सामाजिक संस्था, विविध क्लब, रहिवासी कॉलनी व बचत गट आपणास आव

ब्राम्हणगावमध्ये रंगला ‘होम मिनिस्टर’ चा खेळ
किरकोळ वादातून परप्रांतीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून 
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यास पाच दिवसाची पोलीस कोठडी

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील गणपती व दुर्गादेवी उत्सव मंडळे, सार्वजनिक व्यायाम शाळा, सामाजिक संस्था, विविध क्लब, रहिवासी कॉलनी व बचत गट आपणास आवाहन करण्यात येते की दि.13 मे 2024 सोमवार रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान होणार आहे. त्यादिवशी आपण आपल्या भागातील मतदान केंद्राची निवड करून तेथे  75% च्या पुढे मतदान कसे होईल याकरिता प्रयत्न करावेत. ज्या मतदान केंद्रावर 75% पेक्षा जास्त मतदान होईल त्या पहिल्या 3 मतदान केंद्राकरिता रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र कोपरगाव नगरपरिषदेमार्फत देण्यात येईल अशी माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी सांगितले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी असून तरी  स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आकर्षक पारितोषिक मिळवा या करिता  सहभागी होण्यासाठी दिलेल्या गुगल फॉर्म च्या लिंक मध्ये हीींिीं://षेीाी.सश्रशर्/ीऊाूूकधीुंलथलिवएु8  माहिती भरावी तरी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक  सुहास जगताप यांनी केले आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सर्वच मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान कसे होईल या करिता प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करणार. सुहास जगताप, मुख्याधिकारी तथा प्रशासक

COMMENTS