Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रबळ इच्छाशक्ती,आत्मविश्वास व स्वावलंबन स्वीकारून तसेच नियमित सक्रिय राहून वृद्धावस्था सोनेरी करा ” मानसोपचार तज्ञ डॉ.हेमंत सोननीस

नाशिक -प्रौढ मित्र मंडळ, डिसूझा कॉलोनी -कॉलेज रोड येथील विशेष व्याख्यानात बोलताना प्रमुख व्याख्याते डॉ हेमंत सोननिस यांनी वरील आवाहन ज्येष्ठ ना

अंमली पदार्थासह गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तिघेजण पोलीस कोठडीत
व्यक्तीचा जीव वाचवायला गेला रेल्वे कर्मचारी ;इतक्यात आली ट्रेन अन्…| LokNews24
आमदार बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष

नाशिक -प्रौढ मित्र मंडळ, डिसूझा कॉलोनी -कॉलेज रोड येथील विशेष व्याख्यानात बोलताना प्रमुख व्याख्याते डॉ हेमंत सोननिस यांनी वरील आवाहन ज्येष्ठ नागरिकांना केले. मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक मिळालेलेडॉ सोननीस व्याख्यानात पुढे म्हणाले की,वृद्धावस्था म्हणजे आजार नव्हे, साठीतले ज्येष्ठ ८० वयाचे ज्येष्ठांचे पालक होऊनप्रौढ समन्वयाची साखळी निर्माण होऊन ज्येष्ठांना सुवर्ण दिन पहाता येतील,त्यासाठी सक्रिय राहून आपल्या डॉक्टर समवेत संवाद ठेवल्यास शतायुशी जीवनसूर्य दूर नाही” इंडीयन सायक्याट्रिक सोसायटीच्या “ गाव तेथे मानसोपचार “ या मोहमेअंतर्गत तसेच जागतिक अल्झायमर दिनाचे निमिताने हे विशेष व्याख्यानं आयोजित करण्यात आले होते . डॉ सोननीस यांचे स्वागत आणि प्रास्तविक अध्यक्ष डॉ शरद पाटील यांनी केले, व मंडळाचा अहवाल सादर केला. डॉ प्रा लक्ष्मीकांत भट यांनी मानसोपचार तज्ञ डॉ हेमंत सोननीस यांचा परिचय केला व सूत्र संचालन केले. सौ कल्पना कूवर यांच्या प्रार्थना सादरीकरणाने सुरुवात झाली.

“प्रौढ मित्र मंडळ”  डिसूजा कॉलनी, नाशिक यांच्यातर्फे या निमित्ताने डॉ सोननीस यांचा सत्कार डॉ शरद पाटील,अध्यक्ष यांनी केला. सभासदांचे वाढदिवस या प्रसंगी संपन्न झाले.(श्री पाटील,श्री सी जे गुजराथी,डॉ शेवाळे,प्रा.साळुंके आदी) सचिव प्रा प्रदीप देवी यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास श्री कादि सुरेश, पिंगळे मर्तेंड,कोरान्ने, श्री. जीतेंद्र येवले आदींनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास प्रौढ नागरिकांनी उत्तमरीत्या प्रतिसाद दिला. शंभराच्या घरात प्रौढ नागरिक उपस्थित होते. सखी, समाधानकारक, स्वावलंबी, निरोगी उत्तरार्ध जगणे हे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष्य असले असले पाहिजे असे डॉ. सोननीस यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी अनेक उपयुक्त सूचना ज्येष्ठ नागरिकांना दिल्या, जसे की- 

1 ) मानसिक, शारीरिक, सामाजिक दृष्ट्या सक्रिय राहणे. 

2 ) स्वतःचे कामे स्वतः करणे.

3 ) सर्व शारीरिक तक्रारींचे डॉक्टरांच्या मदतीने योग्य निवारण करणे.

4 )  स्वतःचे आर्थिक नियोजन करणे.

5 )  आपले काळजीवाहक ओळखून त्यांच्याशी नित्य संपर्क ठेवणे.

6 )  नियमित झोप , आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री पाळणे. 

7 )  समाजात , नातेवाईकात ,  मित्रमंडळात मिसळणे.

8 )  वाचन करणे , शब्दकोडी सोडवणे, मेंदूला चालना देणे . 

9 )  बदलत्या वयानुसार जीवनशैलीत योग्य ते बदल करणे.

तसेच डिप्रेशन  ( उदासीनता ) डिमेन्शिया ( स्मृतीभंश) , अल्झायमर आजार जो डिमेन्शियाचा सर्वात प्रमुख प्रकार आहे. इत्यादी महत्त्वाच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देत डॉक्टर सोननीस यांनी हे आजार कसे थोपवावे किंवा कसे ओळखावे आणि त्यावरील उपचारांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सोननीस यांनी साध्या सरळ ओघवत्या भाषेत महत्त्वाची माहिती मोजक्या वेळात मुद्देसूदपणे सर्वांना समजेल अशा प्रकारे सांगितल्याबद्दल उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS