Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठ्ठलराव डव्हाण यांनी दिली अभ्यासिकेसाठी देणगी

राहुरी/प्रतिनिधी ः कै. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण यांच्या प्रथम वर्षश्रद्धा निमित्त पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका या स

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर श्रीरामपुरमध्ये जल्लोष
नगरचे पोलिस राणेंना अटक करणार की नाही?; वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईचे पोलिस निरीक्षकांचे संकेत
वैष्णवदेवी बालमित्रांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

राहुरी/प्रतिनिधी ः कै. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण यांच्या प्रथम वर्षश्रद्धा निमित्त पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका या संस्थेच्या अभ्यासिका साठी 51 हजार रुपयाची मदत वर्षश्राद्धच्या कार्यक्रमांमध्ये सुपूर्त करण्यात आली. ऋषिकेश याचे 19व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यापूर्वी ऋषिकेश हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता.
 अतिशय हुशार व मनमिळाऊ विद्यार्थी होता, परंतु त्याचे अपघाती निधन झाले. आपल्या मुलाला अभ्यास करून अधिकारी होता आले नाही याची दुःख वडिलांच्या मनात होते. आपल्या मुलाचे दुःख बाजूला ठेवून प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेला मदत करून इतर विद्यार्थ्यांनाही अधिकारी होण्यासाठी आपले सामाजिक योगदान द्या वे ही भावना विठ्ठलराव यांच्या मनात आली. त्यानुसार वर्षश्राद्धाचा विधी करताना वस्त्रदान, अन्नदान,ब्राह्मण दक्षिणा,गुरुदक्षिणा याचबरोबर अभ्यासिकेसाठी ही दक्षिणा देण्यात आली.
ही मदत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांच्याकडे तारकेश्‍वर गडाचे मठाधिपती ह.भ.प आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताभाऊ खेडेकर, अनिलजी डोलनर, हरिभक्त परायण वाघमारे महाराज पंढरीनाथ पाटोळे, ऍड कचरू चितळकर, विठ्ठलराव डव्हाण, प्राध्यापक गिरीश मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कैऋषिकेश याला श्रद्धांजली व्यक्त करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी सांगितले की डव्हाण कुटुंबीयांनी अभ्यासिकेसाठी जी मदत सुपूर्द केली त्या मदतीतून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून चांगले अधिकारी *निश्‍चित घडव ले जातील आणि हीच ऋषिकेश साठी खरी श्रद्धांजली असेल अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS