नेवासाफाटा/प्रतिनिधीः राजस्थान जोधपूर येथील भागवत कथाकार गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांनी नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भे

नेवासाफाटा/प्रतिनिधीः राजस्थान जोधपूर येथील भागवत कथाकार गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांनी नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट दिली.यावेळी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या प्रेरणेने नेवासा येथे सुरू झालेल्या व एक तप पूर्ण केलेल्या प्रभातफेरीतील वारकर्यांचे त्यांनी कौतुक केले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आगमन झाल्यानंतर मंदिराचे प्रमुख महंत ह.भ.प. श्री शिवाजी महाराज देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.सद्या गुरुवर्य ब्रम्हलिन श्री बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या 66 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास त्यांनी भेट दिली. इतर धामाप्रमाणेच माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तिर्थक्षेत्र नेवासे भूमीला ही अधिक महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
नेवासा येथील वारकर्यांनी सुरू केलेल्या पहाटेच्या प्रभात फेरीला बारा वर्षे पूर्ण झाली. याबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास प्रभात फेरीच्या माध्यमातून केलेल्या नाम चिंतनाने भगवंत ही प्रसन्न होतात. पहाटेचे नामचिंतन हे पशु ,पक्षी,मुके जीव ही श्रवण करतात.याचे मोठे पुण्य मिळत असल्याचे सांगितले. जेव्हा जेव्हा मी या भागात येईल, तेव्हा, तेव्हा मी दर्शनासाठी येत राहील. अशी सदिच्छा त्यांनी केली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास बसलेल्या वारकर्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने गुरुवर्य श्री शिवाजी महाराज देशमुख व प्रभातफेरीचे चालक बाबुराव ढवळे यांनी श्री राधाकृष्णजी महाराज यांचे संतपूजन केले. यावेळी देवगडचे सेवेकरी बाळू महाराज कानडे, संस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे,भिकाभाऊ जंगले, कृष्णाभाऊ पिसोटे,उद्योजक देविदास साळुंके,माजी सरपंच सतीश गायके, अनिल ताके पाटील,देवगड संतसेवक संदीप साबळे,प्रभात फेरीचे सदस्य डॉ.प्रा.मुरलीधर कराळे,सतीश मुळे,गणेश परदेशी,जालिंदर घुले,सुभाष चव्हाण,कुमार शिंदे,बाळासाहेब बडवे, अर्जुन रणमले,चंद्रकांत डाके,सुनील मैंदाड,काका गायकवाड उपस्थित होते.
COMMENTS