बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानप वस्ती(रूद्रापुर) केंद्र पारगाव(सिरस) शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची इमारत नसल्यान
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानप वस्ती(रूद्रापुर) केंद्र पारगाव(सिरस) शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची इमारत नसल्याने व लोकवर्गणीतून बांधलेले सिमेंट पोल व पत्र्याचे शेड मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समोरील झाडाखाली ज्ञानार्जन करावे लागत असे याविषयी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दि.21 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी शिक्षणाधिका-यांना कंदील भेट आंदोलन करुन निवेदन दिल्यानंतर त्याच दिवशी दुपारनंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड श्रीकांत कुलकर्णी यांनी सानपवस्ती (रूद्रापुर) येथील शाळेला भेट देत विद्यार्थी तसेच पालकांशी संवाद साधत शाळेला वर्गखोली, स्वच्छतागृह बांधकाम, किचन शेड बांधकाम व ईतर आवश्यक असणा-या भौतिक सुविधा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत युडाएस नुसार मप्राशिप मुंबई यांच्या वार्षिक कार्ययोजने अंतर्गत नियोजन समितीच्या वार्षिक कृती आराखडा सन 2023-24 मध्ये मागणी करण्यात आली असुन निधी उपलब्ध होताच बांधकाम करण्याचे लेखी आश्वासन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना दिले आहे.
बीड तालुक्यातील जि.प.प्रा.शा.सानपवस्ती (रूद्रापुर) केंद्र पारगाव (सिरस) याठिकाणी पहिली ते चौथी पर्यंत शाळा असुन मुख्याध्यापक यांच्या अहवालानुसार शाळेची पटसंख्या 17 असुन कार्यरत शिक्षक संख्या 2 असुन सद्यस्थितीत शाळेसाठी 5 गुंठे जागा दानपत्राद्वारे देण्यात आलेली असुन सध्या शाळेसाठी 10 बाय 10 फुटाचे सिमेंट पोल सहाय्याने पत्र्याचे शेड लोक वर्गणीतून 2017 साली उभारण्यात आले असुन ते मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्ग झाडाखाली भरत आहेत.यासंदर्भात डॉ.गणेश ढवळे व सहका-यांनी दि.21 सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी शिक्षणाधिका-यांना कंदील भेटआंदोलन करत निवेदन दिल्यानंतर सायंकाळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड श्रीकांत कुलकर्णी यांनी सानप वस्ती (रूद्रापुर) शाळेला भेट देत शाळेची प्रत्यक्षात पाहणी करत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज करत शैक्षणिक गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत मुख्याध्यापक अर्चना सानप व शिक्षक प्रदिप गायकवाड यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत अभियंता समग्र शिक्षा अभियान जि.प.बीड सुधीर बाहेगव्हाणकर,श्री चाटे उपस्थित होते.यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष,नाथ सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ गिते, सुरेश सानप, शिवाजी नागरगोजे, धनंजय सानप,बाळु सानप, रामचंद्र सानप, संजय पवार, संजय माळी,छगन माळी,गोरख पवार, कैलास पवार, मधुकर सानप,शिला सानप,स्वाती सानप,द्वारका सानप,साक्षी सानप, विकास सानप,सीमा सानप, तुळसाबाई सानप,उषा सानप,भगिनाथ सानप आदि पालक हजर होते.
COMMENTS