ईश्वरपूर / प्रतिनिधी : भोपाल येथे पार पडलेल्या 755 ओपन इंडिया स्पर्धेमध्ये परफेक्ट एक्स शॉट रायफल शूटिंग रेंजचा अथलिट कु. विरेन राहुल गिरिगोसा

ईश्वरपूर / प्रतिनिधी : भोपाल येथे पार पडलेल्या 755 ओपन इंडिया स्पर्धेमध्ये परफेक्ट एक्स शॉट रायफल शूटिंग रेंजचा अथलिट कु. विरेन राहुल गिरिगोसावी याने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल जूनियर पुरुष व्यक्तीगतमध्ये 284 स्कोअर करत रौप्य पदक तर युथ प्रकारात ब्राँझ पदक पटकावले.
कु. आरुष योगेश गोंदकर याने 276 स्कोअर करत अनुक्रमे 7 वा व 8 वा क्रमांक पटकावला. दोघांची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना रायफल शूटिंग प्रशिक्षक नईम मुबारक नरदेकर व सांगली जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत अंदलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS