Homeताज्या बातम्याक्रीडा

विराट कोहली च्या फोटोने चिंता वाढली

विराटचा जखमी अवस्थेतील फोटो सध्या व्हायरल झाला असून त्यात त्याच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहे. हे पाहून चाहते काळजीत आले आहे.  भारताचा स्टार फल

सातारा जिल्ह्यातील वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट
एमएस धोनी बनला पोलिस अधिकारी ?
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती

विराटचा जखमी अवस्थेतील फोटो सध्या व्हायरल झाला असून त्यात त्याच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहे. हे पाहून चाहते काळजीत आले आहे.  भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा ताजा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे चाहते खूप चिंतेत असून कोहलीची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

विराट कोहलीने सोमवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली. या फोटोमध्ये कोहलीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर काही जखमांच्या खुणा आहेत. त्याच्या नाकावर बँड-एड पण होती, पण चेहऱ्यावर हसू होतं. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करताना कोहलीने लिहिले की, “तुम्ही दुसरा माणूस पाहावा.”

कोहलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी अनेक अंदाज लावले. मात्र हा फोटो कधी काढण्यात आला हे विराटने स्पष्ट केलेले नाही. त्याने ते का शेअर केले? हा फोटो एखाद्या जाहिरातीच्या शूटिंगमधील असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. कोहलीला कोणतीही दुखापत नाही. मेकअपच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावर जखमा निर्माण झाल्या आहेत.हा फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहे. 

COMMENTS