Homeताज्या बातम्यादेश

विराट कोहलीची उज्जैनमधील महाकाल मंदिरात भेट

भोपाळ : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शनिवारी पहाटे उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात दर्शन घेत भगवान शिवाचे आशीर्वाद घेतल

चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट
अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.
फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला

भोपाळ : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शनिवारी पहाटे उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात दर्शन घेत भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले. कोहलीने येथील प्रसिद्ध भस्म आरतीत सहभाग घेतला. सध्या भारतीय संघ इंदूरमध्ये असून रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कोहलीने महाकाल मंदिरात उपस्थिती लावली.
कोहलीपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तसेच विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल यांनीही शुक्रवारी महाकाल मंदिरात दर्शन घेतले होते. मंदिर परिसरात कोहली शांत आणि ध्यानमग्न अवस्थेत बसलेला दिसून आला. यापूर्वीही तो अनेकदा महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला असून, पत्नी अनुष्का शर्मासोबतही त्याने येथे भेट दिली आहे. मात्र यावेळी कोहली एकटाच मंदिरात दाखल झाला. महाकाल मंदिरातील भस्म आरती ही विशेष धार्मिक परंपरा मानली जाते आणि देशभरातून भाविक या आरतीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. कोहलीनेही या आरतीत सहभाग घेतला. अलीकडच्या काळात तो आध्यात्मिकतेकडे अधिक झुकलेला दिसत असून, कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकदा प्रेमानंद महाराजांच्या भेटीस जात असल्याचेही पाहायला मिळाले आहे. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरही कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 93 धावांची खेळी साकारली होती. त्याच्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांपैकी पाच डावांत त्याने अर्धशतक ओलांडले असून, त्यात दोन शतकांचा समावेश आहे. इंदूरमध्ये होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार असून, या लढतीत कोहलीकडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताच्या विजयात त्याची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

COMMENTS