नवी दिल्ली ः भारताने वर्षातील पहिली वनडे 67 धावांनी जिंकली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने शतक झळकावले, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शक
नवी दिल्ली ः भारताने वर्षातील पहिली वनडे 67 धावांनी जिंकली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने शतक झळकावले, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 बळी घेतले. उमरानच्या आधी विराट कोहलीने 45 वे वनडे शतक झळकावले. या शतकासह त्याने वनडेत 9 विक्रम केले. त्यांच्याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही काही विक्रम केलेविराटने श्रीलंकेविरुद्ध 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. या खेळीसह विराट कोहलीच्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यातील 257 डावांमध्ये 12,584 धावा पूर्ण झाल्या. हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान क्रिकेटपटू आहे. त्याच्यापाठोपाठ भारताचा सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे. सचिनने 310 तर पाँटिंगने 338 डावात 12,500 वनडे धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीने 11व्यांदा सलग 2 वनडे डावात शतके ठोकली. श्रीलंकेपूर्वी त्याने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यातही शतक झळकावले होते. त्यानंतरही त्याने 113 धावांची इनिंग खेळली होती. या सामन्यानंतर भारताने 2 कसोटी आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. पण वनडे फक्त श्रीलंकेविरुद्धच खेळले. विराटने श्रीलंकेविरुद्ध 129.88च्या स्ट्राईक रेटने शतक केले. 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह वनडे शतके करण्याच्या विक्रमातही तो अव्वल आहे. त्याच्यानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 25 वेळा 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह वनडे शतके झळकावली. तर सचिन तेंडुलकरने 24 वेळा असे केले आहे. भारतासाठी 52 चेंडूत सर्वात जलद वनडे शतक करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती.
COMMENTS